टिव्हीवरल्या धारावाहीका..!
-प्रा.नंदू वानखडे ,
'टीव्हीवरल्या धारावाहिका
पाहून त्यातल्या प्रेम -नायका
घरात डोके सडवत बसती
रिकामटेकड्या काही बायका..!
प्रेमाच्या लफड्याच्या कहाण्या
पाहून होती काही दिवान्या
बिघडून स्वास्थ्य या देशाचं
म्हणूनी रचल्या ऊल्ट्या सवान्या....!
सास-बहू ' अन् 'कुमकुम 'भाग्य
अनैतिक ती शिकवण सारी
कडवट करून तोंड तरीही
बघे आमची बहुजन नारी..!
भांडणे लावणे कामच त्यांचे
कुटुंब बिघडो बहुजनांचे..
गुंतवून ठेवून त्यात तयांना
राज्य करावे आपल्या मनाचे ..!
टिव्हीत बघतील हवेत बोलतील
सामसूम हे पडतील रस्ते..
अत्याचाराने नारी अबलांचे
जीवन होईल अधिक सस्ते ..!
उद्दीष्टांची करण्या पुर्तता
लोकशाहीची करूनी नग्नता
सुखच मिळते त्या धुर्तांना
बहुजनांची बघून भग्नता..
भ्रमिष्ट केले मन अन् मेंदू
अभिव्यक्तीला चेंदू चेंदू..
हाही भोंदू तोही भोंदू
कुणाकुणाचे नाव मी नोंदू...!
उगीच ना जाळ्यात फसावे
घरात चॅनल बंद असावे ...
आनंद घेऊन संसाराचा
कुटुंबा संगती ऊठा बसावे..!!
-प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम
9423650468




No comments:
Post a Comment