सर्वसमाज घटकांच्या वतीने घोटी येथे शिवजयंती दणदणीत साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 23, 2020

सर्वसमाज घटकांच्या वतीने घोटी येथे शिवजयंती दणदणीत साजरी



किनवट : 
येथून जवळच असलेल्या घोटी येथे समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याने शिवजयंती 2020 दणदणीत साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच युवा, जेष्ठ परिवाराने  जयंती हर्ष उल्हासात साजरी केली. 
        सदर जयंतीला गरीब, मध्यम तसेच श्रीमंत वर्ग यांचे सहकार्य होते. गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूकीचे संपूर्ण गावकरी यांनी स्वागत केले. सदर कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कऱ्हाळे, अमरदीप कदम, बालाजी बामणे, गावातील ज्येष्ठ नागरिक जगदीश पाटील गरड, धर्माजी भवरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा मेश्राम, संतोष मिरासे, किशोर चटलेवार, सुधाकर कदम, गौतम पाटील, शिवा मोतेवार, युवराज पाटील, सरपंच यांच्या वतीने उल्हास राठोड, वैभव गरड, निकेतन सुरोशे तसेच वेगवेगळ्या स्तरातून अनेक युवा, शिवप्रेमींनी जयंती साजरी केली. या जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांचे विचार जनसामान्यांच्या मनात रूजवावे हा प्रमुख हेतू आहे.  छत्रपती शिवरायांनी मौलीक  संस्कृतीचे जतन व संवर्धन कसे केले हे सर्वांना कळावे हा आयोजनमागील  मूळ उद्देश आहे. राजू पाटील सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील संपूर्ण  युवा वर्गाने दणदणीत शिवजयंती साजरी केली. सदर जयंतीचे गुनगान संपूर्ण तालुक्यामध्ये केल्या जात आहे. सदर शिवजयंती आद्वितीय रीत्या साजरी करण्यात आली.  समाजातील प्रत्येक घटकाने या शिवजयंतीच्या निमित्ताने सहभाग नोंदविला. घोटी येथील शिवजयंती एक नावाजलेली आहे. आणि या नावाजलेल्या असल्यामुळे घोटी येथील अनेक वर्षापासूनची परंपरा आहे  राजू पाटील यांनी संपूर्ण गावकरी लोकांना सोबत घेऊन जोपासलेली आहे. यापुढेही पुढील कार्यामध्ये त्यांच्या सोबत संपूर्ण घोटीवासीय राहतील. सदर जयंतीला संपूर्ण कामगार, शेतकरी, मजूर वर्ग वेगवेगळे व्यापारी यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News