करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीची प्रतिष्ठाने बंद ठेवावीत ; जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांचे निर्देश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 15, 2020

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीची प्रतिष्ठाने बंद ठेवावीत ; जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांचे निर्देश



नांदेड :
 कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये,व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईंटणकर यांनी दिले.
               येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्या अध्यदक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी  कक्षामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक / मालक यांची बैठक घेण्यात आली.  यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्हााधिकारी डॉ. सचिन खल्लााळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जि.प.उपमुख्य  कार्यकारी अधिकारी एस.व्ही‍.शिंगणे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी श्रीमती आर.पी.काळम, उपशिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक / मालक  यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
              महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू केला असून सदरील कायद्याची दिनांक 14 मार्च, 2020 पासून महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 लागू केलेली आहे. त्यानुसार महानगरपालिका, सर्व नगरपालिका , सर्व नगर पंचायत क्षेत्रातील, सर्व सरकारी व खाजगी अंगणवाड्या, सर्व सरकारी व खाजगी शाळा, तसेच महाविद्यालय, आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्था दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगितले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला असून यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले.
              नांदेड जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा समान, दुध, भाजीपाला, औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून)  दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी सांगितले.
              कोणत्याही व्यक्तीस, संस्था, संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॅानिक किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर व दंडनिय कारवाई करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी यावेळी दिल्या.
              मागील 14 दिवसांत ज्या व्यक्तींनी करोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे, त्यांनी स्वत: याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 020-26127394 , एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष 020-27290066 व टोल फ्री क्रमांक 104 किंवा जिल्हा रुग्णालय नांदेड येथील नियंत्रण कक्ष 02462-249279 संपर्क साधावा.
करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे. त्यास मज्जाव, प्रतिबंध, अडथळा आणण्याविरुध्द दंडनिय कार्यवाही करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News