किनवट माहूर तालुक्यातील विजेसह विविध प्रश्नाबाबत आ. भीमराव केराम यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 14, 2020

किनवट माहूर तालुक्यातील विजेसह विविध प्रश्नाबाबत आ. भीमराव केराम यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन



किनवट :
किनवट -माहूर मतदार संघातील विजेच्या प्रलंबित प्रश्नांसह विविध प्रश्नांची सोडवणूक होवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे. 
              महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना किनवट-माहूर तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्रलंबित कामांना गती मिळावी व विजेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी  आमदार भीमराव केराम यांनी लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे. यात प्रामुख्याने आदिवासी बहूल भाग असलेल्या पांढरकवडा, कळवण व शहादा या ठिकाणी असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या स्वतंत्र विभागीय कार्यालयांच्या धर्तीवर भोकर येथील विभागीय कार्यालयाचे विभाजन करून किनवट येथे नव्याने विभागीय कार्यालयास मंजूरी देण्याबरोबरच माहूर येथे मंजूर असलेल्या प्रस्तावित १३२ के.व्ही. उपकेंद्राचे काम सुरू करावे, प्रस्तावित मंजूर असलेल्या ३३ के. व्ही. उपकेंद्राचे काम सुरू करावे, माहूर तालुक्यातील मोहपूर येथे नव्याने ३३ के.व्ही. उपकेंद्रास मंजूरी द्यावी, १३२ के.व्ही. उपकेंद्र,किनवट ते माहूर लिंक लाईन मंजूर करून दोन्ही उपकेंद्र ग्रीडमध्ये जोडण्यात येण्यासाठी डब्ल्यु.बी.एस. स्कीम राबवण्यात यावी, सन २०१४ - १५ व २०१६ या वर्षात महावितरण आपल्या दारी या योजने अंतर्गत शेतक-यांच्या कृषीपंपासाठी विज जोडणी योजना राबण्यात आली. परंतू अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच किनवट माहूर तालुक्यातील सर्व ३३ के.व्ही. उपकेंद्रांची एम.व्ही.ए. क्षमता वाढवून सर्व ३३ के.व्ही. वाहिन्या व ११ के.व्ही. वाहिन्याची दुरूस्ती करून उपकेंद्रांतील उपकरणांची दुरूस्ती व्हावी. इत्यादी प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. तसेच आदिवासी बहूल किनवट व माहूर तालुक्यासाठी नवीन कामे होण्यासाठी आ. केराम यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे. सदरची कामे नियोजित वेळेत पुर्ण झाल्यास दोन्ही तालुक्यातील विजेची समस्या जवळपास संपुष्टात येवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना होणार असल्याने जनमानसातून आमदार महोदयांच्या कामगीरीवर समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News