जागतिक महिला व सावित्रीमाई फुले स्मृति दिनानिमित्त गोर बंजारा होळी लैंगी नृत्य उत्सव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 14, 2020

जागतिक महिला व सावित्रीमाई फुले स्मृति दिनानिमित्त गोर बंजारा होळी लैंगी नृत्य उत्सव


किनवट : 
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृति दिनाच्या निमित्ताने 'सन्मान नारी शक्तीचा जागर लोकशाहीचा 'करण्यासाठी गोर बंजारा होळी लैंगी नृत्य उत्सवाचे येथील शिवनगरीत आयोजन करण्यात आले होते.
             जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक , डॉ. अशोक बेलखोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक, प्रा.डॉ. सुनील व्यवहारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
              बंजारा समाजात होळी सणाचे अधिक महत्व आहे माघ अमावस्येपासून फाग महोत्सवास सुरुवात होते. महिला व पुरुष गीत गात डफडयाच्या तालावर नृत्य करतात. यावर्षी होळीचे औचित्य व जागतिक महिला दिनी लैंगी उत्सवाचे आयोजन करून महिलांचा सन्मान करण्यात आला. जुनापाणी येथील प्रसिध्द सामकी माता महिला मंडळाच्या महिलांनी पारंपारिक गीत व नृत्य सादर करून नारी शक्तीचा जागर केला . या वेळी स्त्री भ्रूणहत्या, व्यसनाधीनता, बेटीबचाव बेटी पढाव, हुंडाबळी, स्त्री अत्याचार , तंटामुक्ती व ग्रामस्वच्छता अशा सामाजिक विषयांवर गीते प्रस्तुत करण्यात आली. प्रारंभी आयोजन समिती समन्वयक प्रा .डॉ . वसंत राठोड यांनी प्रस्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू विषद केला . मान्यवरांनी महिला दिन व होळी महोत्सवा विषयी मनोगत व्यक्त केले.

               यावेळी मुख्याध्यापक प्रदीप जाधव, उल्हास सुदेगुणेवार, श्रीमती पार्वतीबाई राठोड, प्रा. डॉ . प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा . शोभा शिराढोणकर, सदाशिव जोशी, कैलास चव्हाण, रुपसिंग जाधव, कैलास राठोड, मोहनसिंग चव्हाण, सुभाष राठोड, पांडुरंग राठोड, शाम राठोड, अनिल राठोड, इंदूबाई जाधव, पारसमणी राठोड, नंदा राठोड, प्रा. विद्या चव्हाण यांच्यासह शिवनगरी येथील कर्मचारी, नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.  बी. के. राठोड यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक घन:श्याम राठोड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News