भारतात कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 567 वर ; महाराष्ट्रात 116 तर जगात 4 लाख 22614 - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 25, 2020

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 567 वर ; महाराष्ट्रात 116 तर जगात 4 लाख 22614



नवी दिल्ली :
भारतात मंगळवारी 50 पेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 567 वर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. आतापर्यंत भारतात 21 हजार पेक्षा जास्त लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 116 कोरोनाबाधित आढळले असून सांगलीत एकाच कुटूबातील पाच जण आहेत. संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी घरात राहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी.
           
             कोरोनाचा कहर सुरूच ;
             जगभरात भीतीचे वातावरण
           
कोरोनाचा कहर सुरुच ; मृत्यू आणि लागण वाढतेय, काळजी घ्या जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 18 हजार 892 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4 लाख 22 हजार 614 लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये 3 हजार 281, इटलीत 6 हजार 820, अमेरिकेत 775 , इराणमध्ये 1 हजार 934 , स्पेनमध्ये 2 ह्मार 991, जर्मनीमध्ये 159 , फ्रान्समध्ये 1हजार 100 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . विशेष म्हणजे, अमेरिकेत मंगळवारी ( दि. 24 ) एकाच दिवसात 7 हजार 248 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे .

अजूनही सावध व्हा , एकाच दिवसात 743 लोकांचा मृत्यू 

चीनमध्ये कोरोना व्हायरसची ( 3 हजार मृत्यू ) सुरूवात झाली . तर चीनमधून इटलीत आलेल्या कोरोनामुळे इटलीत मंगळवार ( दि. 24 ) केवळ एका दिवसात तब्बल  743 लोकांचा मृत्यू झाला आहे . त्यामुळे यातून कोरोनाची भीषणता किती आहे , हे दिसत आहे . दरम्यान , जगभरात 18 , 887 लोकांचा कोरोनाने जीव घेतलाय . तर भारतातही आतापर्यंत 567 कोरोनाचे रूग्ण ( 11 मृत्यू ) आढळले आहेत . त्यात महाराष्ट्रातील 112 जणांचा समावेश आहे .

एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोना , महाराष्ट्रात एकूण रुग्ण 116 

कोरोना व्हायरसने महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर घातली आहे . राज्यात आजही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत . सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे . तर मुंबईत 4 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली आहे . राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News