नांदेड :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून पंचायत समिती अर्धापूर येथील अधिकारी व कर्मचा-यांनी निधी संकलीत करून ५० मिटर कापड खरेदी केले. महिला बचत गटाच्या मदतीने ६०० मास्क तयार करण्यात आले आहेत. कोरोना मोहीमेत काम करणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, आशा वर्कर्स, आंणवाडी सेविका, आंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी व ग्राम पंचायत कर्मचारी यांना हे मास्क मोफत वाटप करण्यात आले.
गट विकास अधिकारी मिना रावताळे यांच्या मार्गदर्शनात गट शिक्षणाधिकारी गंगाधर राठोड, विस्तार अधिकारी एस. आर. मोटरवार, डॉ. एस. पी. गोखले, व्ही. एम. मुडकर, ए.के पेठे, गणपत पाडलवाड, दिलीप मोरलवार,सुमेध रणवीर, कक्ष अधिकारी आर.टी सातव, शाखा अभियंता सुलेमान, अधिक्षक जी. एम. लव्हेकर, जकाते, सहाय्यक लेखाधिकारी देशापांडे, नरमिटवार व इतर सर्व कर्मचारी यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात आली आहे.अल्प दरात सक्रिय महीला ग्रामसघ लहान निर्मला बाई खिल्लारे,व शिवरतन बचत गट ज्योती गायकवाड उमरी यांनी सहकार्य केले आहे. आज २९ मार्च रोजी राबवण्यात आली आहे. आरोग्य उपकेंद्र लहान अंतर्गत ४ गावे , उपकेंद्र लोणी खु अंतर्गत ४ गावे, उपकेंद्र दाभड अंतर्गत ६ गावे, उपकेंद्र पिंपळगाव अंतर्गत ४ गावे असे एकूण १८ गावात मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.




No comments:
Post a Comment