3Oमार्च 2020 पर्यंत सर्व शाळा तंबाखुमुक्त कराव्यात असे आवाहन नांदडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केले आहे. त्याच अनुषंगाने आता शाळांना सुट्या आहेत. तेव्हा सर्व मुख्याध्यापकांनी टोबॅको फ्री स्कूल ऍपवर माहिती अपलोड करून 3O मार्च 2020 पर्यंत आपली शाळा तंबाखुमुक्त करावी. या विषयाला चालना देणारा रमेश मुनेश्वर यांचा लेख -संपादक
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे महाराष्ट्र आणि सलाम मुंबई फौंडेशन यांचा संयुक्त उपक्रम म्हणजे तंबाखूमुक्त शाळा..
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी भारतात दहा लाख नागरिकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढ व्यक्ती मध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून आता हे लोन लहान लहान मुलांमध्ये सुद्धा पोहोचले आहे.
भारतात तंबाखू विरोधी कायदा असला तरी निव्वळ कायदे करून प्रश्न सुटलेला नाही तर समाजातील घटकाने याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने एका आदेशान्वये सुगंधित तंबाखू सुपारी पानमसाला व गुटख्याची उत्पादन विक्री साठवणूक वाहतूक व वितरणावर बंदी घातलेली आहे.
मुले हे संस्कारक्षम असतात. मोठ्यांचे ते अवलोकन करून त्याचे चांगले वाईट गुण विद्यार्थी अंगी करतात. तेव्हा शिक्षकांनी तंबाखूच्या उच्चाटन संदर्भात पुढे येणे गरजेचे आहे. तंबाखू शरीरासाठी कसा वाईट परिणाम करणार आहे याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे व ही चळवळ शाळा तसेच महाविद्यालयातून चालवणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासन व सलाम फाउंडेशन यांनी ही चळवळ जोमात सुरू केलेली आहे.
तंबाखूमध्ये घातक रसायने असल्यामुळे तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफुस, गळा, अन्ननलिका, मुत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूचे विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे शाळा तंबाखू मुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शाळेने निर्धारित केलेले 11 निकष पूर्ण केलेली शाळा तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात येते. त्यासाठी शाळेतील तंबाखूमुक्त शाळेने केलेले कामाचे पुरावे द्यावे लागते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी एक मोहीम म्हणून काम केले तर एक-दोन महिन्यात शाळा तंबाखूमुक्त होते. विद्यार्थी तंबाखू मुक्ती साठी निबंध लिहितात, चित्रे काढतात, एवढेच नाही तर आपल्या नातेवाईकांना तंबाखू सोडण्यासाठी भावनिक पत्र सुद्धा लिहितात. यामुळे पालकावर त्याचा परिणाम दिसून येतो. गावातीलच मुले शाळेत असल्याने शाळा तर तंबाखुमुक्त होतेच पण विद्यार्थ्यांचे पालक नातेवाईक पर्यायाने गाव, समाज तंबाखूमुक्त होऊ शकतो.
लहान वयातच तंबाखूच्या परिणामाची मुलांना जाणीव झाली तर ते कधीच त्यांच्या आहारी जाणार नाही. आणि हीच मुले सुदृढ नागरिक म्हणून पुढे येतील. म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संचालनालय पुणे, महाराष्ट्र आणि सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या उपक्रमात ११ निकष पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करूया.. आणि महाराष्ट्रातील सर्वच शाळा, शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीने तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी पुढाकार घेऊन शाळा तंबाखूमुक्त करुया..!
तंबाखू मुक्त शाळा होण्यासाठी असलेले निकष अशी आहेत..
◼️शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व अभ्यागत याकडून करण्यास पूर्णपणे बंदी असावी.
◼️धुम्रपान निषेध जागा येथे धूम्रपान करण्यास कायद्याने मनाई आहे असा फलक शैक्षणिक संस्थेत महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले असावे.
◼️ धुम्रपान निषेध जागा - येथे धूम्रपान करण्यास कायद्याने मनाई आहे. असा फलक शैक्षणिक संस्थेत महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले असावे.
◼️शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक प्राचार्य याकडे सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा (तंबाखू नियंत्रण कायदा) 2003 आणि अध्यादेश याची प्रत असणे आवश्यक आहे.
◼️ शैक्षणिक संस्थेच्या नियोजित 100 यार्ड परिसरात तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णता बंदी असणे आणि शैक्षणिक संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फलक असणे आवश्यक आहे.
◼️शैक्षणिक संस्थेने शालेय आरोग्य उपक्रमात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा अंतर्भाव केलेला असणे जसे की उद्बोधन सत्र मुक्त तपासणी आदी.
◼️ शैक्षणिक संस्थेमध्ये जे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी तंबाखू नियंत्रणासाठी हिरीरीने भाग घेत आहेत त्यांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडून प्रमाणपत्र आणि बक्षिसे देऊन त्यांचा जाहीर सत्कार करावा.
◼️ तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त राज्य सल्लागार प्रतिनिधींचे संबंधित कामासाठी मदत घेतलेली असावी.
◼️ तंबाखूविरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरिवर लिहिलेले चिकट लिहिलेले असणे आवश्यक आहे.
◼️ शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करून आणि समितीच्या त्रेमासिक बैठका आयोजित करून त्याची नोंद घेणे आवश्यक आहे.
◼️ शैक्षणिक संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तंबाखूमुक्त शाळा किंवा तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था परिसर असा फलक लावणे आवश्यक आहे.
-रमेश मुनेश्वर,
स्तंभलेखक, किनवट (नांदेड)
संवाद -7588424735
( लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत.)




No comments:
Post a Comment