नांदेड :
आतरराष्ट्रीय स्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणु संसर्ग बाधीत रुग्ण आढळल्यास सदर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मा . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक 19 मार्च 2020 रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सर्व जनतेने रविवार , दिनांक 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 . 00 ते रात्री 9.0O वाजता कोरोना ( COVID 19 ) शी लढा देण्यासाठी " जनता संचारबंदी चे पालन करण्याचे आवाहन आहे . जनता संचारबंदी म्हणजे " जनतेने जनतेसाठी जनतेवर लागू केलेली संचारबंदी होय , सदर जनता संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवेशी निगडीत व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणीही घराबाहेर पडू नये , असेही आवाहन केले आहे . मा . प्रधानमंत्री महोदयांनी आपले संबोधनात कोरोनाशी दोन हात करण्याकरिता अहोरात्र राबणारे वैद्यकिय सेवा , पोलीस , सरकारी सेवा , विमान सेवा , माध्यम प्रतिनिधी , बस / रेल्वे रिक्षा चालक तसेच घरपोच सेवा देणारे अनेक धाडसी लोक या लढ्यात आघाडीवर आहेत . अशा कठीण प्रसंगी निस्वार्थपणे राष्ट्राची सेवा करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व नांदेड जिल्हयातील जनतेने रविवार , दिनांक 22 मार्च 2020 रोजी सायं . ठिक 05 . 00 वाजता आपल्या अंगणात , दरवाज्यासमोर , बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये उभे राहून 05 मिनीटासाठी टाळ्या वाजवून किंवा घंटा वाजवून अशा सर्वाचे अभिवादन करण्याबददल मा . प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केले आहे . तसेच याव्दारे मी , जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटणकर नांदेड जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखांना मा . प्रधानमंत्री महोदयांचा हा संकल्प सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची विनंती करीत आहे . नागरिकांना आवाहन करण्यासाठी दिनांक 22 मार्च 2020 रोजी सायं , ठीक 05 . 00 वाजता सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था , पंचायत राज संस्था , अग्निशमन सेवा , पोलीस सेवा , होम गार्डस . औद्योगिक आस्थापना यांनी भोंगा वाजवून सर्व नागरिकांना याबाबत सूचित करावयाचे आहे . मनपा आयुक्त , सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसिलदार , सर्व गट विकास अधिकारी , नगर परिषदांचे । नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी " जनता संचारबंदी च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपापल्या कार्यक्षेत्रात योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश याव्दारे देण्यात येत आहेत .

-डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी,नांदेड
कोरोना विषाणुसंदर्भाने पुकारण्यात आलेल्या जनता कपर्युच्या अनुषंगाने तेलंगना राज्यात जाणारे व येणारे वाहनांना बंदी
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार झालेला आहे . त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली असून मोठया प्रमाणावर जिवित हानी होत आहे . कोरोना विषाणुंमूळे बाधीत रुग्ण आपल्या देशातील काही ठिकाणी आढळून आलेले आहेत . सदर कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक २२ / ०३ / २०२० रोजी शासनाने जनता कफ्र्यु जाहीर केल्याने नांदेड शहरातील शेजारील तेलंगना राज्याने तेलंगना राज्यात जाणारे व येणारे वाहनावर दिनांक २२ / ०३ / २०२० रोजी सकाळी ०७ . ०० ते २३ / ०३ / २०२० रोजी सकाळी ०७ . ०० वा . पावेतो बंदी करण्यात आली आहे . तरी नागरीकांनी नांदेड जिल्हयातून तेलंगना राज्यात जाणे व येणे टाळावे . असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
-विजयकुमार मगर
जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड
जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड

No comments:
Post a Comment