भारतीय लोक सेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परिक्षेत एक मागासवर्गीय मुलगी (SC) संपूर्ण देशातून पहिली आली अन् देशभरातील वर्तमानपत्रे, टी.व्ही.चॅनेल व सर्व प्रसार माध्यमांत हेडलाईन झाली अन् गुणवत्ता कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नाही तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी मिळाल्यास संधीचे सोने करू शकतात व गुणवत्तेत सर्वांना मात देवू शकतात हे तिच्या यशाने जगाला वाजत गाजत सांगितले होते. ती भिमकन्या म्हणजे टीना डाबी.
हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची बेटी टीना डाबी आज देश विदेशातील मिडीयात सर्वात जास्त चर्चेले जाणारे नाव आहे. त्यांनी पराक्रमही तसाच गाजविला आहे. तो गाजाविलेल्या भिम पराक्रमामुळे तो म्हणजे सारे जग ज्या कोरोनाच्या नावाने चळासळा कापतय त्या कोरोनाला या भीमकन्येने मातीत गाडून टाकलय. म्हणूनच कोरोनाला नेस्तनाबुत करण्याचा भिलवाडा पॅटर्न व भिलवाड्याची जिल्हाधिकारी टीना डावी जगात हेडलाईन मिळवत आहे.
2015 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत (UPSC) मध्ये टीना डाबी एक अनुसुचित जातीतील मागासवर्गीय संपूर्ण भारतातून टॉपर बनली ही गोष्ट भारतातील सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये एकच चर्चेचा विषय बनलेला होता अन तिच ती भीमकन्या टीना डाबी पुन्हा एकदा देश व विदेशातील मिडीयात चर्चेली जात आहे. यावेळी टीना डाबी तिने कोरोनावर प्राप्त केलेल्या जबरदस्त विजयामुळे म्हणजे जिल्हा भिलवाडा, राजस्थान येथे कोरोना विषाणूला गाडून टाकल्याच्या आपल्या नेत्रदिपक यशामुळे
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आक्टोबर 2018 मध्ये टीना डाबी यांना भिलवाड़ा, राज्यस्थान येथे जिल्हाधिकारी म्हणून पहिली नियुक्ती मिळाली. भिलवाड़ा, राजस्थान. जिल्हाधिकारी टीना डाबी आज सर्वात जास्त चर्चेत येण्याचे कारण की, सर्वात जास्त कोरोना विषाणू संसर्ग असलेला जिल्हा कोरोनामुक्त झाला व कोरोना रोगातून बाहेर येत संपूर्ण कोरोनामुक्ती मिळविलेले भारतातील एकमेव शहर झाल्यामुळे व कोरोनावर विजय मिळविण्यासाठी टीना डाबी यांनी स्वतःच्या कल्पनेतून राबविलेल्या सर्व उपाययोजना भिलवाडा पॅटर्न म्हणून देशभर राबविल्या जात आहेत.
काय आहे हे भिलवाडा पॅटर्न की, हा जिल्हा कोरोनामुक्त होवू शकला. भिलवाडा जिल्हा प्रशासनाने कोरोनापासुन मुक्ती मिळविण्यासाठी ठोस प्रशासकीय रणनिती, तात्काळ निर्णय व निर्णयाची कठोर अंमलबजावणी, संसर्ग निहाय कोरोना हॉटस्पॉट विभागात विभागणी, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियमित दैनिक बैठका व समन्वय, प्रत्येक बाबींचे सुक्ष्म नियोजन, प्रत्येक अधिकारी व जनतेतून सूचना व प्रस्ताव मागविणे व त्यावर तात्काळ योग्य तो निर्णय, निर्णयातील कमतरता तात्काळ दुरुस्त करणे, संपूर्ण भिलवाडा शहराची नाकाबंदी,संपूर्ण शहर वासियांची कोरोना तपासणी व सर्वोत्तम उपचार.
भिलवाडामध्ये 19 मार्च 2020 ला पहिला, 20 मार्चपर्यंत सहा रूग्ण बाधित भेटले. अनेक लोक व डॉक्टरांना कोरोनाबाधित रुग्ण वाढत होते याचा कोरोना संसर्गाचा धोका राजस्थानसह सर्व देशाला होणार होता.
टीना डाबी या 26 वर्षीय जिल्हाधिकारी (IAS) भीमकन्येने अमेरिका इटलीच्याही पुढे राबविलेल्या विविध कठोर उपाययोजना व धोरणामुळे भिलवाडा 100% कोरोना मुक्त झाले व राजस्थान व देशाला कोरोनावर 100 % मात करता येतो हा आशावाद टीना डाबी व त्यांचे सहकारी उदयपूर मेडीकल कॉलेजचे डीन प्रा.डॉ.बी.एल मेघवाल, प्रा.डॉ.राम अवतार बैरवा, डॉ.गौतम बुनकर, डॉ.दौलत मिना, डॉ.सुरेंद्र मिना, डॉ.देव किसान सलगरा, डॉ.मनिष वर्मा, डॉ.कविता वर्मा, डॉ.चंदन, डॉ.महेश, डॉ.राजकुमार, डॉ.शिव व डॉ.सत्यनारायण वैष्णव यांनी रात्रीचा दिवस करुन जगाला दाखवून दिले. विशेष म्हणजे या कोरोना महामारी विरोधात जिवाची बाजी लावून लढणारे उपरोक्त सर्वजन डॉ.बाबासाहेब आंबेडक राजस्थान डॉक्टर असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत हेही विशेष म्हणावे लागेल. भीमकन्या टीना डाबी (जिल्हाधिकारी, भिलवाडा, राजस्थान) व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीच्या खूप खूप मंगल कामना.
-बालासाहेब लोणे, नांदेड




No comments:
Post a Comment