नांदेड :
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल संचलित लॉकडाउन मधील लायन्सचा डबा या उपक्रमाला दानशूर नागरिक भरभरून प्रतिसाद देत असतांना महिला देखील पुढे येवून त्यांनी आपल्या घरी 125 पोळी भाजीचे पॉकेट बनवून प्रोजेक्ट चेयरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कडे वितरणासाठी सुपूर्द केले.
नवव्या दिवशी सकाळी दीपनगर येथील मोहिनी जोशी व अंबिकानगर येथील दीपाली नामले यांनी पुढाकार घेऊन काही महिलांकडून पोळी भाजी बनवून घेतली. लॉकडाऊन मध्ये मिळालेला वेळ सत्कारणी लागावा यासाठी त्यांनी लायन्सच्या डब्याची निवड करून स्वच्छेने पोळी भाजी बनवून दिली. या कामासाठी माधुरी करडखेडकर, सुरेखा नागलवाड, श्रुती देशमुख, स्मिता वैद्य, राधिका उन्हाळे, माणिक सोवनी, रेणुका देशपांडे, गोदावरी क्षीरसागर, शिवनंदा नागठाणे या महिला भगिनींनी परिश्रम घेतले. शनिवार पासून लॉक डाऊन संपेपर्यंत आता विद्यार्थ्यांना दररोज दोन्ही वेळेसचा डबा घरपोच वितरीत करण्यात येणार आहे. वसीम बाबुसेठ यांनी 250 बॉटल मिनरल वॉटर, मास्क, हॅन्डग्लोज दिले. ते रस्त्यावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी यांना दिले.
दिवसभरात पाचशे पन्नास डब्याचे संजय अग्रवाल, शिवा शिंदे, सुनील साबू, अंबादास कदम यांनी वितरण केले. ॲड. संजय जामकर यांनी शंभर डब्याची नोंदणी केली असून आता पर्यंत पाच हजार तीनशे डब्याची अग्रीम नोंदणी झाली असून त्यापैकी एकोणतीशसे डबे विद्यार्थ्यांना व चोवीस तास कर्तव्यावर असलेल्या पोलीस तसेच आरोग्य व सफाई कर्मचारी यांना वाटप करण्यात आल्याची माहिती लायन्स सेंट्रलचे सचिव डॉ. मोहन चव्हाण यांनी केले आहे.





No comments:
Post a Comment