बाहेरुन येणाऱ्या लोकांची जिल्हा सिमेवर तपासणी ; विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्या हस्ते इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, April 16, 2020

बाहेरुन येणाऱ्या लोकांची जिल्हा सिमेवर तपासणी ; विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्या हस्ते इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे वाटप


नांदेड : ईतर जिल्ह्यातून व राज्य सिमेवरुन कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण नांदेड जिल्ह्यात प्रवेश करु नये म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा व राज्य सिमेवर लावण्यात आलेल्या 25 चेकपोस्टवर देण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे (ताप तपासणी उपकरण) वाटप नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
               कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात  संचारबंदी लागू केलेली असल्याने नांदेड जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातून नांदेड जिल्ह्यात विनाकारण कोणतेही वाहन व लोक प्रवेश न करण्यासाठी नांदेड जिल्हयाच्या सिमेवर 10 आंतरजिल्हा चेकपोस्ट व 15 आंतरराज्य सिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

               यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे  या आंतरजिल्ह्यातून किंवा आंतर राज्यातून नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या अत्यावश्यक सेवेमधील लोकांचे चेक पोस्टवर या मशीनने शरीराचे तापमान  तपासणी करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा सध्या कोरोनामुक्त असून बाहेर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना तपासण्यात येणार असून चेक करते वेळी कोणास तापाचे लक्षण असल्यास त्यांना नांदेड जिल्ह्यात प्रवेश नाकारला जाणार असल्याचे सांगितले आहे.

               नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये. शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीचा कालावधी वाढविलेला असल्याने जनतेने त्यांच्या घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
               यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, बाळासाहेब देशमुख, किशोर कांबळे, मंदार नाईक, विलास जाधव, रमेश सरवदे, बी.मुदीराज, सुनिल पाटील व पोनि देशपांडे, चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी रामेश्वर कायंदे व अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.

 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News