बुद्ध तत्वज्ञानाचे प्रबल भाष्यकार ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज -बालासाहेब लोणे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 30, 2021

बुद्ध तत्वज्ञानाचे प्रबल भाष्यकार ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज -बालासाहेब लोणे

  



राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक भारतातील महान संत व कर्ते समाजसुधारक  होत.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या समता व विज्ञानवादी  विचारांचा मोठा प्रभाव होता.

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात जातियता निर्मुलन, स्त्री- पुरुष समानता, अंधश्रध्दा निर्मुलन, महिला व ग्रामोन्नती, शिक्षण व विज्ञानवादाचा प्रसार, प्रचारा बरोबर सामाजिक, राष्ट्रीय एकात्मते बरोबर व बुध्दाच्या विश्वबंधुत्वाचा संदेशही जगाला दिलेला आहे.

            संत तुकडोजी महाराज हे निव्वळ समाज प्रबोधनच करुन थांबले नाहीत, तर १९४२ भारत छोडो आंदोलनादरम्यान इंग्रज सरकार विरूध्द आंदोलन केल्यामुळे त्यांना अटक झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काही काळ तुरुंगवास सुध्दा भोगला.

         राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार, कृती व प्रबोधनाचा मुख्य बिंदू हा मानवी कल्याण, सर्वधर्म समभाव, स्त्रीपुरुष समानता व ग्रामिण भागाचा विकास राहिलेला आहे. ग्रामिण भागात शिक्षण नसल्यामुळे धर्मभोळेपणा व अंधश्रध्दा वाढली आहे. ग्रामिण भाग संपन्न होण्यासाठी ग्रामिण भागात शिक्षणासह सर्व सुविधा निर्माण व्हाव्यात. सर्व गावे संपन्न व्हावीत यासाठी तुकडोजी महाराज यांचा कटाक्ष होता. ग्रामिण भागातील भोळ्या भाबडया जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून त्यांना नागवणाऱ्या भट्टांचा ते कीर्तनातून चांगला समाचार घेत असत. 

            संत तुकडोजी महाराज यांचे शिक्षण लौकीक अर्थाने तिसरीपर्यंत झालेले असले तरी त्यांची बुद्धी व विचारशक्ती अतिशय तल्लख होती. त्यांची मराठी व हिंदी भाषेतील अनेक अजरामर प्रबोधन गीते, पुस्तके याची साक्ष देतात. या भारतात बंधूभाव नित्य वसू दे वरची असा दे, या झोपडीत माझ्या, कशाला जातो रे बाबा पंढरी, कशाला जातो रे काशी.

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा हे दोघेही डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सन्मानपूर्वक उल्लेख करीत असत. दोघांनाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप आदर व त्यांची विद्वता अन कार्याचा मनापासुन अभिमान वाटत असे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भंडारा लोकसभेची निवडणूक लढवत असतांना  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी इतर विषयावर चर्चा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकृतीची अगोदर काळजी घ्यावी कारण आपले तंदुरुस्त जगणे भारत देशाच्या प्रगतीसाठी व  देशवासियांसाठी अत्यंत गरजेचे आहे असे खूप आपूलकीने सांगितले.

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५५ मध्ये जपान देशात टोकियो येथे आयोजित विश्वशांती एक विश्व धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परिषदेमध्ये जवळजवळ २८ राष्ट्राच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. भगवान बुद्धाच्या पंचशीलाने विश्वात शांतता प्रस्थापित होऊ शकते’ या प्रस्तावाला दोन चारच लोक विरोध करीत होते. पण त्यांनी सर्वसभेला वेठीस धरले होते.

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विषयी  ‘मेरी जपान यात्रा’ या प्रवास वर्णनात लिहितात -

मैने आचार्य से कहॉ,‘ एक तो प्रस्ताव रखना नहीं था और रखा तो अब वापस लेना ही नहीं. वह अब पंडितजीकी नहीं. हमारे देश की बात रहेगी.

    इस विषयपर एक घंटा बडी खलबली मची. तब हमने सभापति को समझाया. राजनीति की दृष्टी छोडकर पंचशील तत्वों को मान्यता देने मे हमारी सभा धार्मिकता का ही रक्षण करती है, इस बातपर मैने जोर दिया.

    पंचशील सिद्धान्त में बताई हुई हर बात में विश्व शांन्ति की दृष्टि है और हमारी सभा भी यही चाहती है. पंचशील पंडितजीका नहीं, विश्वका है, अत: वह इस सभा का भी विषय होत सकता है I

मेरे इन विचारोंसे सभा सहमत हुई. प्रस्ताव स्वीकृत हुआ. अगर प्रस्ताव अस्वीकृत होने का मौका आता तो मैं वहॉ से उठ जाता और कहता कि, ‘तुम लोग पक्षपाती हो’I तो भी मैने भाषण में बोलने का संकल्प करके रखा... फिर प्रस्ताव होने लगे. समारोप करने के लिए अध्यक्षने मुझे कहा. पहले मेरा परिचय दिया गया. जब मै खडा हुआ तब मेरी भी वही हालत हुई जैसे स्वामी विवेकानंद की होती है, मुझमे एक निर्भय शक्तिने प्रवेश किया. भाषण का जोश बढा. तालीपर ताली पडी. वह भाषण सुनकर अध्यक्षने कहा, हम लोगोंने जो भाषण अभी सुना है, वही इस परिषद का सार है, हमारे दिलपर गहरा असर हुआ है.’’  ग्रीस के प्रतिनिधीने कहा, ‘‘यही है सच्चा भाषण है, सच्चे विचार इन्ही को कहते है’’ या परिषदेचा समाप्तीचा दिवस होता.

         ४ ऑगस्ट १९५५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भारतात जेव्हा परत आले. नागपुरात त्यांचा पहिला सत्कार हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यानी घेतला. ‘बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा अविस्मरणीय इतिहास’ वामनराव गोडबोले यांच्या पुस्तकात पान क्र. ६२ वर ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्तांत दिल्या गेला आहे.

         तो संक्षिप्त रुपात..

याच सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानच्या विश्वशांती परिषदेमध्ये भाग घेऊन भारतात परतले होते. जपान इत्यादी बौद्ध राष्ट्रांचा दौरा केल्यामुळे ते आपल्या भाषणात बौद्ध धर्माची वारेमाप स्तुती करताना मी त्यांना पाहिले. तेव्हा मला असे वाटते की, तुकडोजी महाराजांना याच विषयावर बोलण्याकरिता आपल्या संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये आमंत्रित करावे. याच उद्देशाने प्रेरित होऊन बुद्ध दृत सोसायटीच्या विद्यमाने १८ सप्टेंबर १९५५ ला सीताबर्डीवरील धनवटे चेंबर्सच्या गच्चीवर राजस्वमंत्री मा.भगवंतराव मंडलोई यांच्या अध्यक्षतेखाली तुकडोजी महाराजांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उद्बोधन केले जपान, बॅकॉक, रंगून इत्यादी सर्व बौद्ध राष्ट्रात माणुसकी कशी जपली जाते जी मानवतेवर आधारित आहे.पण आपल्या भारत देशात, ही कशी समाज रचना की एकाच्या स्पर्शाने दुसरा विटाळतो, केवळ जन्मानेच एक उच्च आणि दुसरा नीच गणला जातो. चांभाराचा धंदा करीत नसतांनाही चांभार समजला जातो. गणला जातो. उलट जोडे शिवूनही ब्राम्हण ब्राम्हणच राहतो. असली घातकी समाजरचना बदलली पाहिजे.

      १९५५ च्या पूर्वीपासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रबोधनातून भगवान गौतम बुद्धांचा विचार लोकांना सांगितल्या जात होता. भगवान गौतम बुद्धाची २५०० वी जयंती १०० गावामधून एकाच वेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक महिनाभर ‘समयदान यज्ञाच्या’ स्वरुपात साजरी केल्या गेली. लोकांनी आपल्या आयुष्यातील १ तास लोकांच्या सेवेत द्यावा. अशा प्रकारचा उद्देश समयदान यज्ञाचा होता. ह्या यज्ञाचा समारोप शंभर गावांतील लोकांनी एकत्र करून बुद्ध पोर्णिमेला चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे भव्य प्रमाणात साजरा केला. त्यावेळेस प्रबोधन करताना भगवान बुद्धांचा मानवतेचा विचार काय आहे, भगवान बुद्धाचे पंचशील तत्वे मानव जीवन उन्नत करू शकते. असा संदेश लोकांना दिला.

   याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भगवान बुद्धाला समर्पित एक भजन सादर केले.


समयदान दे दो हमको एकही कलाक चाहे I..,

आरजू हजारी सुनिये, देश को जगाना है.।।


या भजनाच्या शेवटी राष्ट्रसंत म्हणतात-

एकही ‘कलाक’ दे दो, रोज रोज सेवा भर दो।

कहे दास तुकड्या इसको, बुद्ध को चढाना है।

        १४ ऑक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दीन, दलित, दु:खितांना भगवान गौतम बुद्धाच्या विचाराची दीक्षा दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले.

 ते एका अग्रलेखात लिहितांना म्हणतात..

महाविद्वान बनने के बाद भी उच्चवर्णीय कहलाने वालोंने बाबासाहब को अपने कतार में नहीं बैठने दिया. अछूत माने गये लोगो में हजारो आचरणशील लोग थे, लेकिन उन्हे जानवरों से भी बेहतर समझा गया. यह था रुढीविरुद्ध हिन्दुधर्म. संत प्रणाली में यह बात कहा ? भक्त सजन कसाई. संत चोखामेळा और महात्मा रैदास चमार वहॉ उतने ही उॅचे समझे गये जितने संत एकनाथ, रामदास और तुकाराम, लेकिन समाज संतमत पर अटल कहॉ है ? बाबासाहेब ने खूप सोचा. आज का अछूत कल कलमा पढकर इस्लाम बने या बप्तिस्मा लेकर ख्रिश्चन हो जाये तो तुम्हारे सर पर नाच सकता है कि नही ? फिर तुम्हारे बने रहने पर हमे बराबरों सें क्यों नही रखते? क्या बायबल और कुरान में तुम्हारे वेदमंत्रो से अधिक ताकत है? लेकिन शंकराचार्य नही माने, आखिर उन्हे छलांग मारही ही पडी.

   अंतस्थ बुध्द विचाराने व आचाराने प्रेरित  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र विनम्र अभिवादन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या खूप खूप मंगल कामना.

 -बालासाहेब लोणे, नांदेड

9421756489 (Wts) / 8975401662


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News