किनवट :
आता एपीएल ( केशरी ) शिधापत्रिका धारकांना माहे मे व जुन 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार असल्याचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आपल्या देशातील नोव्हेल कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एपीएल ( केशरी ) मधील ज्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत तसेच शेतकरी योजने अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही , अशा एपीएल ( केशरी ) मधील लाभार्थ्यांना माहे मे व जुन 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलती दराने अन्नधान्यचा लाभ देण्याबाबत शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.
एपीएल ( केशरी ) मधील सदर लाभाथ्याना गहू रु 8 / - प्रतिकिलो व व तांदूळ 12 / - प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ या प्रमाणे 5 किलो अन्नधान्य माहे में व जुन 2020 या दोन महिन्याच्या कालावधी करिता वितरीत करण्यात येणार आहे .
ज्या एपीएल ( केशरी ) मधील शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे . त्या शिधापत्रिका धारकांच्या नोंदी संगकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाली नसेल , तरी त्या शिधापत्रिकाधारकांना या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने व परिमाणात अन्नधान्य देण्यात येणार आहे असेही तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी कळविले आहे.




No comments:
Post a Comment