नांदेड : आज रविवार ( दिनांक १७/०५/२०२० रोजी ) सायं . ०५.०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १४/०५/२०२० ते दिनांक १६/०५/२०२० रोजी पाठविण्यात आलेल्या ३७४ स्वॅब पैकी सर्व ३७४ स्वॅबचा अहवाल प्राप्त झालेला आहे . त्यामध्ये एकूण १३ रुग्ण हे पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझीटीव्ह अहवालाची संख्या ९७ झाली असली तरी ३० रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने सुटी देण्यात आली. ०२ रूग्ण फरार आहेत.०५ जणांचा मृत्यू झाला असून आता नांदेडात एकूण रुग्ण ६० आहेत.
आज दिनांक १७/०५/२०२० रोजी पंजाब भवन येथील ४ रुग्णांना योग्य तो औषध उपचार देवून त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . एकूण ९७ रुग्णांपैकी ३० रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. ६० रुग्णांपैकी ८ रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ५० रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटर मध्ये २ रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु आहे . औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण ५ रुग्णाचा मृत्यु झाला असून मृत्यु पावलेले रुग्ण हे रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची अवाहान करण्यात येत आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment