किनवट : लॉकडाऊनच्या काळात शेतीशी निगडीत असलेल्या वेल्डींग वर्कशॉपची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी येथील साहेबराव पवार स्वामी यांनी प्रशासनाकडे केली आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसह कृषी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच स्टेशनरी आदी व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी दिली आहे.वेल्डींग वर्कशॉप हा व्यवसाय शेतीशीच निगडीत आहे.शेतीसाठी लागणारी चाके, औजारे वेल्डींग वर्कशॉपमध्येच तयार होतात.गेल्या २ महिन्याच्या लॉकडाऊनमुळे वेल्डींग वर्कशॉप चालविणारे व्यावसायिक तसेच यावर विसंबून असणारे कारागिर,कामगार हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.कामाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शेतीशी निगडीत असणारी इतर प्रतिष्ठाने उघडण्याची शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, आता खरीप हंगाम तोंडावर असताना शेतीशीच निगडीत असणाऱ्या वेल्डींग दुकानांवरच बंदीचा अन्याय आहे. दुकानमालक तसेच कारागिर व कामगारांची व्यवसायाअभावी होणारी हेळसांड लक्षात घेऊन शासनाने वेल्डींग वर्कशॉपची दुकाने उघडण्याची परवानगी त्वरित द्यावी,अशी मागणी पवार स्वामी यांनी केली आहे.




No comments:
Post a Comment