६१ दिवसानंतर किनवटवरुन नांदेड व माहूरसाठी धावली " लालपरी " : मंत्री, ऍड. अनिल परब यांनी आजपासून बससेवा सुरू होणार असल्याचे केले होते जाहीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 22, 2020

६१ दिवसानंतर किनवटवरुन नांदेड व माहूरसाठी धावली " लालपरी " : मंत्री, ऍड. अनिल परब यांनी आजपासून बससेवा सुरू होणार असल्याचे केले होते जाहीर



किनवट (नांदेड ) : कोरोनाचा फैलाव  रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार 'रेडझोन व कंटेंनमेंट झोन ' वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून शुक्रवार ( दि. २२ मे )  पासून  जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड.अनिल परब यांनी दिली होती. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधत जिल्हा अंतर्गत बस वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी सहमती दर्शविल्याने दिलेल्या निर्देशानुसार आगारप्रमुख मिलिंद सोनाळे यांनी सकाळी सात वाजता नांदेड व माहूरसाठी बस सेवा सुरु केली.
              रेडझोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात दिलेल्या निर्देशानुसार  " जिल्हा-अंतर्गत " ठरलेल्या नियोजनानुसार 22.05.2020 पासून बस वाहतूक सुरू करण्यात आली.सकाळी 7 वाजता नांदेड साठी निघालेल्या पहिल्याच बसला, किनवटहुन प्रवाशी मिळाले नाही, परंतु चिखली फाट्यावरून 3 नांदेड, बोधडी ( बुद्रूक ) वरून 1 नांदेड, बेल्लोरी (धानोरा ) येथून 1 इस्लापुर असे पाच प्रवाशी पहिल्या पन्नास किलोमीटरमध्ये मिळाले.


          दुसरी बस माहूर साठीं सकाळी 7 वाजता सोडण्यात आली ; परंतु या पहिल्या फेरीला प्रवाशी प्रतिसाद मिळाला नाही.


जिल्हा अंतर्गत 50℅प्रवाशी व covid19 बचाव नियमावली नुसार लॉकडाउन काळात देण्यात येणारी बस सेवा 
किनवट - नांदेड करिता
7.00 वा 
11.00 वा
16.00 वा 
नांदेड -किनवट 
8.30 वा
11.30 वा
15.30 वा
----------------------------------------
किनवट - माहूर करिता 
7.00 वा
10.00 वा 
13.00 वा 
16.00 वा 
माहूर - किनवट  करीता 
8.30 वा
11.30 वा
14.30 वा
17.30 वा 
---------------------------------------

विशेष म्हणजे माहूर आगार च्या सुद्धा बस किनवट मार्गाने नांदेडला जाणार आहेत.9.15,14.15ला माहूर आगारच्या किनवट येथून सुटणाऱ्या वेळा 8.30,11.30,14.45,16.45


वाहक बुकिंग करताना गाडीत चढतांना तिकीट देईल. वाटेत बस खाली उतरून तिकीट देईल. जेणेकरुन गाडीत फिरणार नाही.


रेडझोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात शुक्रवार ( दि. 22 )पासून " जिल्हा-अंतर्गत "
एसटी बस सेवा सुरु होणार
-मंत्री, ऍड. अनिल परब यांची माहिती  

मुंबई : कोरोनाचा फैलाव  रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार *रेड झोन व कंटेंनमेंट झोन* वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून शुक्रवार ( दि. २२ मे )  पासून  जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे.  ते पुढे  म्हणाले की,  २३ मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊन च्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने  *रेड झोन व कंटेंनमेंट झोन*  वगळता  काही अटीशर्तींच्या अधीन राहून  एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. 

अर्थात,त्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.  

१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत हि बस सेवा सुरु राहील. 
२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. ४.जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही.    (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना  सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.   
६. प्रवासामध्ये प्रत्येक  प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

वरील अटी व शर्तींचे काटेकोरपाने पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन मंत्री, ऍड. अनिल परब यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News