आदेश, नियमांचे पालन न झाल्यास कायदेशीर कार्यवाही ; नमूद दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत सुरु कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवांना मुभा -जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 23, 2020

आदेश, नियमांचे पालन न झाल्यास कायदेशीर कार्यवाही ; नमूद दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत सुरु कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवांना मुभा -जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश



नांदेड  : जिल्ह्यातील नमूद दुकाने, बाजारपेठा सुरु ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. परंतु नमूद दुकाने, बाजारपेठच्‍या ठिकाणी गर्दी वाढल्‍यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गमीत आदेशाचे पालन न झाल्यास दंडात्‍मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल. प्रतिबंधीत क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) मध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा व अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील. तर प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्‍या अधीन राहून मुभा देण्‍यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
             कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजना करण्याबाबत नांदेड जिल्‍हयात पुढील आदेशापर्यंत खालील बाबींना नियम, अटी व शर्तीच्‍या अधिन राहून  चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे निर्गमीत आदेश तसेच नांदेड जिल्‍हयात जमावबंदी आदेश, नियमावलीसह 31 मे 2020 पर्यंत नागरी,  ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात संदर्भात नमूद जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश व शुध्‍दीपत्रकानुसार निर्गमीत आदेशातील अटी व शर्ती जशास तसे पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनानुसार नांदेड जिल्‍हयात प्रतिबंधीत क्षेत्र (कंटनेमेंट झोन) वगळून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत.
नांदेड जिल्‍हयात पुढील बाबी प्रतिबंधित राहतील
·         सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्‍था व शिकवणी वर्ग आदी बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील.
·         हॉटेल, रेस्‍टॉरंट आणि इतर आदरातिथ्‍य सेवा या गृहनिर्माण, आरोग्‍य, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्‍य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्‍या व्‍यक्‍ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच या सेवेसाठी बसस्‍टॉप, रेल्‍वेस्‍टेशन येथे चालू असलेल्या कॅन्‍टीनचासुध्‍दा वापर करता येईल. रेस्‍टॉरंटला खाद्य पदार्थाच्‍या होम डिलेव्‍हरीसाठी स्‍वयंपाकघर वापरण्‍यास मुभा असेल.
·         सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्‍यायाम शाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे बंद राहतील.
·         सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल.
·         सर्व धार्मिक स्‍थळे, पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्‍यादीवर बंदी राहील.
नांदेड जिल्‍हयातील टाळेबंदीच्‍या कालावधीत सायं 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागु राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवेकरिता नेमण्‍यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यांच्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. या वेळेत विनाकारण फिरतांना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
आरोग्‍य सेतु वापर : आरोग्‍य सेतुचा वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्‍या प्रादुर्भावाबाबत त्‍वरीत सूचना मिळते व त्‍याचा फायदा व्‍यक्‍तीश व समाजाला सुध्‍दा होतो त्‍यामुळे अँड्रॉइड फोनचा वापर करणा-या सर्व  नागरिकांनी मोबाईलमध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करावा. शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्‍या व इतरांच्‍या सुरक्षितेसाठी आरोग्‍य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. नांदेड जिल्‍हयातील सर्व नागरिकांनी आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्‍याचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्यावतीने करण्‍यात आले आहे.
आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्‍ठ नागरिक, अनेक व्‍याधी असणारे व्‍यक्‍ती, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी (लॉकडाऊन) काळात अत्‍यावश्‍यक कामाचे, आरोग्‍याचे कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्‍यांनी घरीच राहावे व प्रशासनास सहकार्य करावे.
नांदेड जिल्‍हा नॉनरेड झोनमध्‍ये असल्‍याने यापूर्वी या कार्यालयाकडून दुकाने व आस्‍थापना चालू ठेवण्‍यासाठी  देण्‍यात आलेल्‍या सवलती यापुढेही चालू राहतील. तसेच त्‍या व्‍यतिरिक्‍त पुढील नमूद प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून उर्वरित क्षेत्रातील बाबींना सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत नियम व अटीच्‍या अधीन राहून मुभा देण्‍यात आली आहे.
·         क्रीडा कॉम्‍पलेक्‍स आणि स्‍टेडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्‍यायामासाठी मोकळी राहील. परंतू या ठिकाणी प्रेक्षक आणि  Group Activities करीता मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्‍यायाम व त्‍यासंबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील.
·         सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूकीस पुढील प्रमाणे मुभा राहील. टु व्हिलर- 1 व्‍यक्‍ती. थ्री व्हिलर- 1+2 व्‍यक्‍ती. फोर व्हिलर- 1+2 व्‍यक्‍ती.  
·         नांदेड जिल्‍हयांतर्गत बससेवा जास्‍तीतजास्‍त 50 टक्‍के क्षमतेनुसार सुरु करण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर व स्‍वच्‍छतेची उपाययोजना करणे आवश्‍यक राहील.
·         सर्व दुकाने, बाजारापेठ सुरु ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. परंतु उक्त दुकाने, बाजारपेठच्‍या ठिकाणी गर्दी वाढल्‍यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्‍यात येत नसल्‍याचे दिसून आल्‍यास दंडात्‍मक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.
या बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) मध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा तसेच, अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील.
वरील दुकाने, आस्‍थापनाच्‍या ठिकाणी खालील उपाययोजना बंधनकारक असतील.
Ø  कामाच्‍या ठिकाणी, दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्‍डवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे.
Ø  एका वेळेस दुकानात 5 पेक्षा जास्‍त ग्राहकास प्रवेश राहणार नाही.
Ø  दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्‍या चेहऱ्यावर मास्‍क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्‍यथा 1 हजार रुपय एवढा दंड संबंधितांकडून आकारण्‍यात येईल.
Ø  मानवी संपर्कात येणा-या सर्व वस्‍तू, ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे.
Ø  ग्राहकांकडून खरेदीनंतर पैश्‍यांची देवाण-घेवाण आरबीआयच्‍या सुचनेनुसार ई-वॉलेटस व स्‍वाईप मशीनव्‍दारे करण्यावर भर द्यावा.
Ø  वरील नेमून दिलेल्‍या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्‍यास तसेच उपाययोजनेचे भंग केल्‍यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्‍यात येईल.
नांदेड जिल्‍हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रतिबंधीत क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) मधील वगळून  शुक्रवार 22 मे पासून 100 टक्के अधिकारी, कर्मचारी उपस्थितीवर चालू करण्यात आली आहेत.   
परिशिष्‍ट दोन नुसार
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्‍यास 1 हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल.  सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत. लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी 50 पेक्षा जास्त आमंत्रित असु नयेत तसेच, लग्‍न सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच पारपाडणे आवश्‍यक असेल. अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये. दारु, पान, गुटखा, तंबाखू इ. चे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्‍यथा कायदेशिर कारवाई  करण्‍यात येईल. सर्व दुकाने ही दोन ग्राहकामध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एकावेळेस 5 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत अशा प्रकारे चालु राहतील.
 कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना : थर्मल स्क्रीनींग हॅंडवाश सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे. कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे जसे दरवाज्याचे कडी, कोंडी आदीचे    निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे. सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे. तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात.
रेड झोन व्‍यतिरिक्‍त भागात पुढील बाबींना परवानगी नाही
यामध्ये हवाई, रेल्‍वे  व  मेट्रो  प्रवास, आंतरराज्‍य  मार्ग  वाहतूक, शैक्षणिक  संस्‍था, आदरातिथ्‍य / हॉटेल्‍स, शॉपिंग  मॉल्‍स, प्रार्थनास्‍थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे, 65 वर्षे वयावरील  व 10 वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा, आंतर जिल्‍हा बससेवा या बाबींचा समावेश आहे.
रेड झोन व्‍यतिरिक्‍त भागात पुढील बाबींना परवानगी आहे
यामध्ये दारुची  दुकाने, वैद्यकिय  सुविधा पुरविणारे  दवाखाने / क्‍लीनिक (ओपीडी), जिल्‍हांतर्गत बस सेवा, मालाचा पुरवठा, औद्योगिक आस्‍थापना (शहरी), औद्योगिक आस्‍थापना (ग्रामीण), शहरी भागातील सीटू बांधकाम, इतर खाजगी बांधकाम स्‍थळे, शहरी एकल विक्रेता दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारी दुकाने, ई-कॉमर्स अंतर्गत अत्‍यावश्‍यक वस्‍तू, ई-कॉमर्स अंतर्गत अत्‍यावश्‍यक नसलेल्‍या वस्‍तू, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये (शंभर टक्के उपस्थिती), कृषि विषयक कार्य, बँक आणि वित्‍त, कुरियर व पोस्‍टल सेवा, वैद्यकिय अतितात्‍काळ सेवांची हालचाल, केशकर्तनालय दुकाने, स्‍पा, सलून, प्रेक्षकांव्‍यतिरिक्‍त स्‍टेडियम, घरपोच सेवा देणारे रेस्‍टॉरंट, दुय्यम निबंधक/ आरटीओ / DY आरटीओ. टॅक्‍सी, कॅब, रिक्‍शा व चार चाकी वाहने- आहे-  1+2  व्‍यक्‍ती. दुचाकी वाहने- आहे-  1  व्‍यक्‍ती.
प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) मध्ये फक्त मालाचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने, वैद्यकिय अतितात्काळ सेवांची हालचाल या बाबींना परवानगी आहे. याशिवाय इतर बाबींना परवानगी नाही.
केश कर्तनालय, स्‍पा सलुन्‍सची दुकाने सुरु ठेवण्यासाठी अटी व शर्ती
दुकानाच्‍या दर्शनी भागात ग्राहकाने स्‍वतःचा टॉवेल/नॅपकीन सोबत आणण्‍याबाबतचा फलक लावावा. तसेच जो ग्राहक स्‍वतःचे टॉवेल नॅपकीन आणणार नाही त्‍यांना दुकानात प्रवेश देऊ नये. कोणत्‍याही परिस्थितीत एका ग्राहकास वापरलेला टॉवेल, कापड इतर ग्राहकांकरीता वापरू नये. दुकान उघडल्‍यानंतर तसेच प्रत्‍येक ग्राहकाच्‍या वापरानंतर बैठक व्‍यवस्‍था व औजाराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. केस कर्तनालय स्‍पा/सलुन्‍सची दुकानामध्‍ये प्रतिक्षेवर जागेची उपलब्‍धता लक्षात घेता जास्‍तीत जास्‍त चार ग्राहक, व्‍यक्‍तींना  दुकांनात थांबविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. येणा-या प्रत्‍येक ग्राहकासाठी स्‍वतंत्र टॉवेल, ब्‍लेड व वारंवार वापरण्‍यात येणारे इतर साहित्‍य स्‍वतंत्र व संपुर्ण निर्जंतुकीकरण करून वापरावे. सेवा देणारा व सेवा घेणारा सोडून इतर व्‍यक्‍तीमध्‍ये 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. मास्‍क, रुमाल नाका तोंडाला झाकुण ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्‍यक आहे. तसेच दुकानामध्‍ये  सॅनिटायझर, हॅन्‍डवॉश, साबण, व इतर हात धुण्‍याचे साहित्‍य ठेवणे बंधनकारक राहील. प्रत्‍येक ग्राहकाचे केस कर्तन केल्‍यानंतर रिकाम्‍या खुर्चीचे निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे. ग्राहकांना केवळ Appointment घेऊनच येण्‍यास कळवावे व ग्राहक विनाकारण दुकानामध्‍ये वाट  पाहत राहणार नाही याची सलुन्‍स मालकांनी दक्षता घ्‍यावी. या अटींचे उल्‍लघन केल्‍यास दंडात्‍मक व कायदेशिर कार्यवाही करुन  दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.
या आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्‍यक कायदेशिर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे.
महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत-नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत  करावीत. गावपातळीवर- ग्रामपंचायत  व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करावे.
याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांचेकडे सादर करावीत.  संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व  आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. सर्व संबंधित यंत्रणांनी अत्‍यावश्‍यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्‍द कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. असे आदेश 22 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News