नांदेड : १३५ अहवाला पैकी १२५ अहवाल निगेटिव्ह ; तर सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सव्वाशे झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी शनिवारी (दिनांक २३/०५/२०२० रोजी ) सायंकाळी सहा वाजता दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना विषाणु संबंधात आज शनिवारी ( दिनांक २१/०१/२०२० रोजी ) प्राप्त झालेल्या एकूण १३५ अहवालापैकी १२५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले व नवीन सहा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२५ झाली आहे .
आता प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी करबला भागातील दोन रुग्ण ( १ पुरुष वय १८ वर्षे , १ स्त्री वय ६ वर्षे ) व कुंभारटेकडी येथील दोन रुग्ण ( १ पुरुष वय १५ वर्षे व १स्त्री वय २८ वर्ष ) व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील दोन रुग्ण( १ पुरुष वय ३४ बर्षे व १ स्त्री वय २२ वर्षे ). या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे .
आज दिनांक २३/०५/२०२० रोजी ग्रामीण रुपालय बारड येथील कोवीड केअर सेंटर येथील १ रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील २ रुग्ण असे एकूप ३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . आतापर्यंत १२५ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत्त ६२ रुग्णांवर औषध उपचार चालू आहे .
दिनांक २३ / ०५ / २०२० कोरोना संशयीत व कोविड रुग्णांचा संशीप्त माहिती तक्ता :
१.सर्वेक्षण १३१४०७
२.घेतलेले स्वॅब ३०८२
३. निगेटीव्ह स्वॅब २७४०
४. आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब ०३+ ०६
५. एकूण पॉझिटिव्ह रूग्ण संख्या १२५
६. स्वॅब तपासपी अनिर्णीत संख्या ११९
७. स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या १४
८. मृत्य संख्या ०६
९. रुग्णालयातून सुट्टी दिलेली रुग्ण संख्या ५५
१०. रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण६२
११. स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या ८०
एकूण १२५ रुग्णांपैकी ६ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ५५ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . ६२ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड येथे सहा रुग्ण , पंजाब भवन कोविड केअर सेंटर , यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ४९ रुग्ण , उपजिल्हा रुपालय मुखेड येथे ५ , ग्रामीण रुपालय भोकर येथे एक रुग्ण व ग्रामीण रुंग्णालय बिलोली येथे एक रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आपि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप " डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते . असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ ईश्वरराव भोसीकर यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment