किनवट : केरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्राना लागणा-या आवश्यक औषधी व साहित्य खरेदीसाठी चौदाव्या वित्त आयोगातून परवानगी मिळाल्यानंतर खरेदीत झालेली अनियमितता पाहता किनवट व माहूर च्या गटविकास अधिका-यांना याबाबत खर्चाचा संपुर्ण हिशोब आमदार भीमराव केराम यांनी मागीतल्याने कुणाची गोची होणार ? हे प्रकरण कुणावर शेकणार ? हे येणारा काळच ठरणार आहे.
किनवट व माहूरच्या गटविकास अधिका-यांना दिलेल्या लेखी पत्रात आ. केराम यांनी नमूद केल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांना लागणा-या तथा आवश्यक असलेल्या औषधी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मा. जिल्हाधिका-यांनी परवानगी देवून त्याबाबत मार्गदर्शक सूचना व तत्वे ठरवून दिले होते. असे असतानाही चौदाव्या वित्त आयोगातील निधी खर्चात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तेंव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयांकडून आपली परवानगी घेवून किती रक्कम ग्रा.पं. निहाय जाहिरात प्रसिध्दीसह निविदा व खरेदी केलेल्या सर्व साहित्याची संपुर्ण माहीती संकलित करून तात्काळ सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर रक्कम उचल करूनही ग्रामपंचायतींनी साहित्य खरेदीस विलंब का केला याची कारणमिमांसा घेवून तातडीने कार्यवाही करावी असा निर्वाणीचा इशारा आ. भिमराव केराम यांनी किनवट व माहूरच्या गटविकास अधिका-यांना दिला आहे. यामुळे पंचायत समिती स्तरावर एकच खळबळ उडाली असून प्रकरण कुणाकुणावर शेकणार याबाबत विविध तर्कवितर्कांना उधान आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.



No comments:
Post a Comment