वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरीस मुदतवाढ द्या -आमदार भीमराव केराम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 24, 2020

वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरीस मुदतवाढ द्या -आमदार भीमराव केराम






किनवट : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या सिंचन विहीरींची कामे पुर्णत्वास न गेल्यामुळे उर्वरीत खोदकाम व बांधकाम पुर्ण करण्यासाठी या कामांना मुदतवाढ देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी कृषी व सैनिक कल्याण मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
              कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केलेल्या मागणीपत्रात आ. केराम यांनी नमूद केले आहे की, देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर असलेला लॉकडाऊन व संचार बंदी तथा जमावबंदीमुळे सन २०१९-२० या वर्षात राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत सिंचन विहीर लाभार्थी शेतक-यांना मार्च अखेरपर्यंत कामे पुर्णत्वास नेता आले नाहीत. त्याउपर पावसाळाही समोर येवून ठेपल्यामुळे सिंचन विहीरींची राहीलेली कामे पुर्णत्वास नेण्यास शेतकरी लाभार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिंचन विहीरींच्या अपुर्ण कामांना पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळणे गरजेचे असल्यामुळे या कामांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आ. केराम यांनी कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News