तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची घनसावंगी येथे बदली; तर किनवटचे भूमिपुत्र उत्तम कागणे रूजू होणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 27, 2020

तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची घनसावंगी येथे बदली; तर किनवटचे भूमिपुत्र उत्तम कागणे रूजू होणार



किनवट : येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार नरेंद्र देशमुख यांची घनसावंगी जि.जालना येथे विनंतीनुसार बदली झाली असून त्यांचे जागी पाथरी येथे सध्या कार्यरत असलेले तहसीलदार  तथा किनवटचे भूमिपुत्र उत्तम कागणे हे तहसिलदारपदी रूजू होणार आहेत.
             अत्यंत अभ्यासू, प्रेमळ स्वभावाचे व प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले नरेंद्र देशमुख हे 31 मे 2017  रोजी तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. त्यांनी  येथील
कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणून 
अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 
केला होता. स्थानिक स्वराज्य संस्था, 
विधानसभा व लोकसभा सार्वत्रिक 
निवडणूका त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. कोरोना संसर्गाच्या टाळेबंदीत तालुका प्रशासनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
            येथील तहसीलदार यांच्या रिक्तपदी विनंतीनुसार बदलीनंतरची पदस्थापना मिळालेले उत्तम कागणे हे येथील भूमिपुत्र असून 
त्यांनी यापूर्वी किनवट येथे महसूल-1 तसेच माहूर येथील तहसील कार्यालय व श्री दत्तशिखर संस्थान, माहूर येथे आणि अहमदपूर येथे नायब तहसीलदार म्हणून आपली कारकिर्द यशस्वीपणे  सांभाळली आहे. सध्या पाथरी जि.परभणी येथे तहसीलदार 
म्हणून  त्यांनी अत्यंत चांगले कार्य केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News