रस्ता नसल्याने गरोदर महिलेस करावा लागतो आजही बैलगाडीतून जीवघेणा प्रवास - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 27, 2020

रस्ता नसल्याने गरोदर महिलेस करावा लागतो आजही बैलगाडीतून जीवघेणा प्रवास



किनवट : शिवशक्तीनगर-घोगरवाडी येथील 2 कि.मी.रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. तेथे 
रस्ता नसल्याने गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी बैलगाडीने न्यावे लागते.  येथील सुनिता दशरथ मडावी या आदिवासी गर्भवती महिलेस  मंगळवारी ( दि.26 मे 2020 रोजी ) सकाळी बैलगाडीतून 
दवाखान्यात नेण्यात आले.  सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मुंडे, दत्ता आडे, आरोग्य 
विभागाचे अमृत तिरमनवार यांनी महिलेस 
दवाखान्यास नेण्यासाठी सहकार्य केले. 
     अत्यंत खराब अवस्थेतील 2 कि.मी.रस्ता पार केल्यानंतर  चांगला रस्ता येतो. तिथपर्यंत रुग्णवाहिकेचे आगमन होते. अशा प्रसंगी प्रसववेदनेने गर्भवती महिलांना प्राणालाही मुकावे लागते. 
    यापूर्वी दि.23 ऑक्टोबर 2016 रोजी अशीच एक घटना या 100 टक्के आदिवासी  गावात घडली 
होती. अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी मागणी होत असतांना या रस्त्यासाठी वनविभाग, जिल्हा परिषद, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातून भरघोस निधी प्राप्त झाला. परंतु आजपर्यंत तेथे रस्ताच तयार झाला नाही. हा आलेला निधी कुठे गेला ? या गंभीर रस्ता प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी तेथील नागरीकांची मागणी आहे. 

या रस्त्यासाठी आलेला निधी टीएसपी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असून कोरोना परिस्थिती व लॉकडाऊनमुळे या रस्त्याचे काम थांबले असून लवकरच या कामाला सुरूवात होणार  आहे
-प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगीतले. 

कोरोना परिस्थिती पाहता या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावू
-आमदार भीमराव केराम    

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News