आज एकही नविन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही ; तर ०७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना दिली रुग्णालयातून सुट्टी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 27, 2020

आज एकही नविन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही ; तर ०७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना दिली रुग्णालयातून सुट्टी


नांदेड : आज एकही नविन रुण पॉझिटीव्ह आढळला नाही ; तर ०७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.आजपर्यंतच्या एकूण १३७ पॉझिटिव्ह अहवाला पैकी ८६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून ४४ रूग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
         सविस्तर माहिती अशी की, आज बुधवारी ( दिनांक २७/०५/२०२० रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणु संदर्भात  प्राप्त झालेल्या एकूण १४९ अहवाला पैकी १४४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त ' झाले असून एकही नविन रुण पॉझिटीव्ह आलेला नाही . त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही १३७ आहे.
         आज एनआरआय यात्री निवास कोविडकेअर  सेंटर येथील ०७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत १३७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८६ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरीत ४४ रुग्णांवर औषध उपचार चालू असून त्यातील २ स्त्री रुग्ण वय ५२ व ५५ वर्षे यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे .
        दिनांक २५/०५/२०२० रोजी पाठविण्यात आलेल्या १२२ स्वॅब तपासपी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल व दिनांक २७/०५/२०२० रोजी ४२ रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे, त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण १३७ रुग्णांपैकी ७ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे व ८६ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. ४४ रुग्णांपैकी ०८ रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय , नांदेड , पंजाब भवन कोवीड केअर सेंटर , यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे २१ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ५ , ग्रामीण रुग्णालय भोकर येथे १ रुग्ण , ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय , माहुर येथे १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय , गोकुंदा येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे ४ रुग्ण असून २ रुग्ण मुंबई येथे संदर्भीत करण्यात आले असून इतर सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 27/05/2020 वेळ 05.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 3511
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3197
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1682
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 221
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 45
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3152
• आज घेतलेले नमुने - 42
• एकुण नमुने तपासणी- 3502
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 137
• पैकी निगेटीव्ह - 3085
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 122
• नाकारण्यात आलेले नमुने - 14
• अनिर्णित अहवाल – 140
•  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 86
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 136132 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News