नांदेड ( लक्ष्मण भवरे ) : माजी केंद्रीय ग्रामविकास तथा संसदिय कार्य राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी आज बुधवारी (ता. २७ ) रात्री उशिरा राजकीय सेवानिवृत्ती जाहिर केली आहे.
यापुढे आपण नविन पीढीतील नेतृत्व घडविण्यासाठी मार्गदर्शन करू असं श्रीमती पाटील यांनी फेसबुक या सामाजीक माध्यमातून जाहिर केलं आहे. श्रीमती सूर्यकांता पाटील या युपीए - 2, सरकारच्या प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास तथा संसदीय कार्य राज्यमंत्री होत्या. श्रीमती पाटील या तीन वेळा लोकसभेवर आणि एकदा विधानसभेवर निवडून आल्या होत्या. श्रीमती सूर्यकांता पाटील या खूप काळ काँग्रेस पक्षात होत्या १९९९ साली शरद पवार यांच्या बरोबर त्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या. पुढे आॅगस्ट २०१४ पासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं.




No comments:
Post a Comment