माजी नगरसेवक शंकर अण्णा गाडगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, May 30, 2020

माजी नगरसेवक शंकर अण्णा गाडगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन


नांदेड : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा नांदेड मनपाचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले शंकर अण्णा गाडगे यांचे शनिवारी ( ता. 30 ) सकाळी 8 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षे होते.
                  विजयनगर (यशवंत नगर)येथील रहिवाशी असलेले शंकर अण्णा गाडगे यांना शनिवारी सकाळी छातीत वेदना होऊ लागल्याने तात्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी  ( ता.30 ) मे 2020 सांयकाळी 5 वाजता गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
        त्यांच्या पश्वात  2 मुले, 2 मुली, 2 भाऊ, 2 बहिणी , सुना, जावई, नातू असा मोठा परिवार आहे. शंकर अण्णा गाडगे यांनी विध्यार्थी दशेपासूनच स्वतःला आंबेडकरी  चळवळीत झोकून दिले होते. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड याचे खास विश्वासु म्हणूनही ते परिचीत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांना भावपूर्ण आदरांजली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News