आठ्यान्नो वर्षीय निराधार महिलेस पोस्ट बँकेने केले घरपोच अनुदान वाटप: हमारी दुवा है बेटा निराधाराचे आशीर्वाद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 31, 2020

आठ्यान्नो वर्षीय निराधार महिलेस पोस्ट बँकेने केले घरपोच अनुदान वाटप: हमारी दुवा है बेटा निराधाराचे आशीर्वाद



किनवट : आदिवासी भागातील चिखली ( बुद्रूक )  येथील आठ्यान्नो वर्षीय खतीजा बी. शेख हमजा यांना चालता- फिरता येत नाही. बँकेत जाता येते नाही.पोस्टमन भीमराव गोफणे यांनी खतीजा आजीच्या घरी जाऊन त्यांच्या अंगठ्याचा ठसा पोस्ट बँकेच्या स्कॅनरवर घेतला. आपल्या एईपीएस प्रणाली द्वारे निराधार योजनेचे अनुदान रुपये तीन हजार रोख रक्कम काही सेकंदात काढून त्यांच्या हातावर ठेवली. तेव्हा खतीजा आजी पोस्टमनला आनंदून म्हणाली, बेटा मेरी तुझे दुवा है. बेटा मुझे दवा लानी है पैसे नहीं थे, बेटा सरकार सब दे रही है.असे म्हणून पोस्टमन भीमराव गोपणे यांना त्यांनी आशिर्वाद दिला.
            चिखली ( बुद्रूक ) येथील पोस्ट बॅंकेचे पोस्टमन भीमराव गोपणे हे डाक अधिक्षक नांदेड शिवशंकर बी. लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटकाळी चिखली बीओ व त्याच्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या- तांड्यात व गावात दररोज  जाऊन पोस्ट बँकेची जनजागृती करीत आहेत.  निराधार, दिव्याग, अंध अपंग, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर अशा सर्वाना पोस्ट बँक व पोस्ट खात्याचे महत्व पटवून विविध योजनांची माहिती देऊन प्रचार व प्रसार या भागात मोठ्या प्रमाणात करून त्यांनी पोस्ट बँकेची सेवा  घराघरात पोहचवली आहे.
पोस्टमन भीमराव गोपणे हे याच गावचे रहिवासी असल्याने त्यांना चिखली येथील सर्व लोक ओळखतात.
            निराधार, दिव्यांग, गोरगरीब ज्येष्ठ नागरिक यांचे अनुदान शासनाने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, आय. सी. आय. सी.आय बँक, आंध्र बँक,पंजाब बँक, एक्सेस बँक, एच .डी .एफ. सी .बँक, युनियन बँक व ईतर बँकेच्या खात्यात  जमा केले आहे.
या बँकेत रांगेत उभे राहणे वृद्ध महिला व पुरुषांना शक्य नाही. या सर्व बँकेच्या खात्यावर जमा झालेले पैसे पोस्ट बँकेच्या एईपीएस प्रणाली द्वारे सर्व प्रकारच्या अनुदानाचे पैसे घरपोच पोस्टमन उचलून देत आहेत.
          आज देशाचे सेवक म्हणून पोस्ट कर्मचारी एक योद्धा म्हणून रात्रन्- दिवस जनतेची सेवा करीत आहेत. ' सेवा ' या शब्दाचे दोन अर्थ होतात पहिला म्हणजे निराधार,दिव्यांग, गोरगरीब, अंध, दुबळ्यांची सेवा ही मानवतावादी असते. सर्वात महत्वाचं म्हणजे ती केली जाते.
          दुसरी सेवा म्हणजे अर्थव्यवस्थाची सेवा पोस्ट बँक घरोघरी जाऊन  ही सेवा करीत आहे. पोस्ट बँक सेवा केली जात नाही तर सेवा दिली जाते पुरवली जाते.
अशीच सेवा चिखली येथे पोस्टमनने दिली. आठ्यान्नो वर्षीय खतीजा बी. शेख हमजा यांना चालता- फिरता येत नाही. बँकेत जाता येते नाही.
           पोस्टमन यांनी या खतीजा आजीच्या घरी जाऊन त्यांच्याआंगठ्याचा ठसा पोस्ट बँकेच्या स्कॅनरवर घेतला. आपल्या एईपीएस प्रणालीद्वारे निराधार योजनेचे अनुदान रुपये तीन हजार रोख रक्कम काही सेकंदात काढून त्यांच्या हातावर ठेवली. तेव्हा खतीजा आजी पोस्टमनला आनंदून म्हणाली, बेटा मेरी तुझे दुवा है. बेटा मुझे दवा लानी है पैसे नहीं थे, बेटा सरकार सब दे रही है.
असे म्हणून पोस्टमन भीमराव गोपणे यांना त्यांनी आशिर्वाद दिला.
नांदेड डाक विभाग आशा हजारो जनतेंची सेवा करीत आहे.
 या नांदेड डाक टीम ला सलाम....

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News