नांदेड : नांदेड जिल्ह्यात रविवार 31 मे 2020 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 30 व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी 28 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर 2 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही 146 झाली आहे. रविवार 31 मे रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील एक पुरुष रुग्ण बरा झाला असून आतापर्यंत 104 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात उर्वरीत एकुण 34 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील 2 नवीन पॉझीटीव्ह रुग्ण पुरुष असून त्यांचे वय 27 व 32 वर्ष आहे. त्यांच्यावर मुखेड उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत. औषधोपचार चालू असलेल्या 4 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण ज्यांचे वय 52 व 65 आणि दोन पुरुष ज्यांचे वय 38 व 80 असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 39 हजार 674, घेतलेले स्वॅब 3 हजार 890, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 378, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 2, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 146, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 148, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 27, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 104, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 34, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 187 एवढी आहे.
शनिवार 30 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 152 स्वॅब तपासणी अहवालापैकी 30 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 122 अहवाल रविवार 31 मे रोजी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. रविवार 31 मे रोजी 65 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल सोमवार 1 जून रोजी सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
एकूण 146 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 104 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 34 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण 14, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथील कोविड केअर सेंटर येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ऍप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 31/05/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 3884
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3717
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1964
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 155
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 56
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3661
• आज घेतलेले नमुने - 65
• एकुण नमुने तपासणी- 3890
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 146
• पैकी निगेटीव्ह - 3378
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 187
• नाकारण्यात आलेले नमुने - 27
• अनिर्णित अहवाल – 148
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 104
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 8
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 139674 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment