माहिती उपसंचालक मोहन राठोड यांची सेवानिवृत्ती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 31, 2020

माहिती उपसंचालक मोहन राठोड यांची सेवानिवृत्ती


             माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागाचे उपसंचालक मोहन राठोड आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.

             मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमारेषेवर असलेल्या किनवट तालुक्यातील मांडवी परीसरातील कोठारी तांडा येथील रहिवासी असलेले राठोड स्नेहशील आणि आतिथ्यशील स्वभावासाठी सर्वत्र ओळखले जातात.

               मांडवी , किनवट आणि औरंगाबाद येथे शिक्षण घेऊन ते लोकमत दैनिकात दाखल झाले. त्या दैनिकाचे परभणी आणि जालना येथील जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. बातमी आणि कार्यालय व्यवस्थापन याबाबतीत तेथे संपादन केलेला अनुभव त्यांना शासकीय सेवेत उत्तम उपयोगाला आला.

             उस्मानाबाद , अकोला , यवतमाळ , नागपूर आणि पुणे येथील जिल्हा माहिती अधिकारी पद तसेच नवी दिल्ली ,अमरावती , आणि पुणे येथील उपसंचालक तसेच नागपूर येथील संचालक पद त्यांनी समर्थपणे सांभाळले. तेथे आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला.
             खरे म्हणजे त्यांच्यापाशी आजही उत्तम कार्यक्षमतेने काम करण्याची वृत्ती , उमेद , उत्साह आहे. अधिक मोठ्या क्षेत्रात काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी बुद्धी आणि चातुर्य आहे. त्याचा त्यांनी उपयोग करावा ही मनापासून सदिच्छा..  
              उद्या सकाळपासून सुरू होणाऱ्या नव्या आयुष्यासाठी श्रीमान मोहनजी राठोड साहेब आपणास आपण शिक्षण घेतलेली शाळा जिल्हा परीषद हायस्कूल (मुलांचे ) किनवटच्या वतीने शुभेच्छा..
         
-मोहन जाधव, मुख्याध्यापक,
 जिल्हा परिषद हायस्कूल (मुलांचे ), किनवट

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News