टाळेबंदीत नांदेड येथून झाला उत्तमनगर पुणे येथील तोळेकर-शेंडे यांचा ऑनलाईन आदर्श मंगलमय विवाह सोहळा ; देश - विदेशातून वऱ्हाडींनी दिले ऑनलाईन शुभाशीष - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 1, 2020

टाळेबंदीत नांदेड येथून झाला उत्तमनगर पुणे येथील तोळेकर-शेंडे यांचा ऑनलाईन आदर्श मंगलमय विवाह सोहळा ; देश - विदेशातून वऱ्हाडींनी दिले ऑनलाईन शुभाशीष



नांदेड ( मधुकर पवार ) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसराईच्या कालावधी मध्ये लाॅकडाउन झाल्यानें नियोजित विवाहसोहळा शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन मंगलमय विवाह सोहळा ऑनलाईन संपन्न झाला आहे.
            विवाह सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी आयोजित आदर्श मंगलमय विवाह सोहळ्यातील वर हे नांदेड येथील  गंगासागर व प्रकाश तोळेकर यांचे प्रथम चिरंजीव मनोज तर वधु ही येरखेडा, कामठी, नागपूर येथील निरंजना व प्रमोद शेंडे यांची प्रथम कन्या निधी होती . यांचा विवाह संस्कार दि.३१/०५/२०२०रोजी दुपारी १२-३० वाजता उत्तमनगर, पुणे येथे १० नातेवाईकाच्या उपस्थितीत अगदि साध्या पद्धतीने ऑनलाईन आयोजित केला होता.

            भारतीय बौध्द महासभेचे  केंद्रीय शिक्षक तथा बौध्दाचार्य रविकिरण भानुदास जोंधळे यांनी नांदेड येथून विधी घेऊन हा मंगल  विवाह संस्कार सोहळा पार पाडला. या सोहळ्यासाठी झुम ऍप द्वारे नांदेड येथून तोळेकर व मित्र परिवार, नागपूर येथुन शेंडे व मित्र परिवार, ऑस्ट्रेलीया येथुन निखिलेश गोवंदे, मध्यप्रदेश येथुन प्रकाश गजभिये, बनारस येथून रिवा, बेंगलोर येथुन पुजा भगत, अमरावती, पुणे,पुर्णा येथून अनुक्रमे केरबा ऊमरे, अमोल डोनेराव , प्रविण ऊमरे, चक्षुवान जोंधळे आदि जन ऑनलाईन ऊपस्थित होते. टाळेबंदी उठली तरी कोरोना विषाणू काही संपणार नाही, तेव्हा आता या विषाणू सोबत जगायचं वास्तव आम्ही स्विकारलं आहे हेच या ऑनलाईन विवाह सोहळ्यातून दाखवून दिलं आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News