नांदेड : नांदेडात आज बुधवारी (दिनांक ०३/०६/२०२० रोजी ) सायंकाळी ०५.०० वाजता प्राप्त कोरोना विषाणू संदर्भात प्राप्त झालेल्या एकूण २३८ अहवालापैकी १९३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन २३ रुग्णांचा स्वॅब पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १७५ झाली आहे .
आज दिनांक ०३/०६/२०२० रोजी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील १ व पंजाव भवन यात्री निवास येथील २ रुग्ण असे एकूण ३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १७५ रुग्णांपैकी १२४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ४३ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०२ स्त्री रुग्ण ज्यांची वय ५२ व ६५ आणि १ पुरुष ज्याचे वय ३८ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
आज प्राप्त झालेल्या २३ पॉझीटीव्ह रुग्णांपैकी १ रुग्ण महिला वय वर्ष ३५ रा.आमदापूर ता.देगलूर जि.नांदेड आणि १ पुरुष वय वर्ष २१ रा . भेंडेगाव ता.मुखेड येथील तसेच इतर २१ रुग्ण हे देगलूर नाका व शिवाजीनगर परीसरातील असून त्यापैकी १५ पुरुष अनुक्रमे वय वर्ष ४.९ , १०,१४,१५.१८,१८,२०,२०,२२,२५.२७,३०,३४,४५ आणि ६ स्त्री अनुक्रमे वय वर्ष ५.८.१६.३०,३२,३५ आहेत.सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे .
दि .०३ / ०६ / २०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता :
१. सर्वेक्षण १४१४३४
२. घेतलेले वेब ४२६४
३. निगेटिव्ह स्वब ३७३९
४. आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या २३
५. एकूण पॉझीटीव्ह रुग्ण १७५
६. स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १६४
७. स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या ५१
८. मृत्यू संख्या ८
९. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १२४
१०. रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ४३
११. स्वॅब तपासणी रुग्ण संख्या १३०
दिनांक ०२/०६/२०२० रोजी प्रलंबित असलेल्या २६७ स्वॅब तपासणी अहवालापैकी २३८ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित १९ अहवाल आज रात्री उशिरा पर्यत प्राप्त होईल व दिनांक ०३/०६/२०२० रोजी १११ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील .
एकूण १७५ पैकी ८ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १२४ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित ४३ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८ रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण ३० , उपजिल्हा रुग्णालय मुखेड़ येथे ३ रुग्ण असून १ रुग्ण , उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आणि १ रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला असून उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधपचार सुरु आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 03/06/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4207
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 3914
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2137
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 161
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 105
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3809
• आज घेतलेले नमुने - 111
• एकुण नमुने तपासणी- 4264
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 175
• पैकी निगेटीव्ह - 3739
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 130
• नाकारण्यात आलेले नमुने - 51
• अनिर्णित अहवाल – 164
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 124
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 8
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 141434 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.




No comments:
Post a Comment