नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आज 4 जून रोजी सायं. 6.30 फेसबुक लाईव्हवर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 4, 2020

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आज 4 जून रोजी सायं. 6.30 फेसबुक लाईव्हवर



नांदेड : लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी व उपचाराबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आज गुरुवारी ( दि. 4 जून रोजी ) सायं. 6.30 फेसबुक लाईव्हवर आहेत. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावाा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आह.

लाईव्ह पहा https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/ या लिंकवर

कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात आपले शासन आणि विविध सेवाभावी संस्था एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या आजाराबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. या शंकांचे वेळीच निरसन करून नागरिकांनी आपल्या वर्तनातही सुरक्षिततेसाठी बदल करून घेतले पाहिजेत.
कोविड 19 च्या निवारणासाठी शासनाच्या प्रयत्नांना आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व जनता समर्थ साथ देत आहे. आपली ही प्रयत्नांची पराकाष्ठा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सावरण्याची आहे. अशा या काळात जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे यासाठी आपल्याशी फेसबुक लाईव्हद्वारे आपले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सोबत आज डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आयुष व इतर उपचाराबाबत माहिती देतील.
हा संवाद आज सायं.  6.30 वाजता  https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/  या फेसबुक पेजवर सर्वांना साधता येईल.
संवाद दिनांक 4 जून 2020
वेळ सायंकाळी 6.30 वा
लाईव्ह पहा https://www.facebook.com/Dr.VipinItankarIAS/ या लिंकवर


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News