स्वस्त धान्य दुकानदार व तोलाई कामगारांना विमा संरक्षण लागू करा -आमदार भीमराव केराम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 4, 2020

स्वस्त धान्य दुकानदार व तोलाई कामगारांना विमा संरक्षण लागू करा -आमदार भीमराव केराम



किनवट : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर केवीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवरून युध्दपातळीवर उपाय योजना राबवित असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांप्रमाणेच ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व तोलाई कामगारांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
             राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या पत्रात किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी सदरची मागणी केली असून राज्य शासनाने दि. २९ मे २०२० रोजी निर्गमित केलेले शासन निर्णयाचा हवाला देवून त्याच धर्तीवर  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जनतेच्या थेट संपर्कात असलेले ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार व सहकारी कामगार हे जनतेच्या थेट संपर्कात येत असल्याने यांचीही अत्यावश्यक सेवेत गणना करून त्यांना कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंतच्या कालावधीपर्यंत ५० लाखांचे विमा संरक्षण लागू करावे अशी मागणी लिखित पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News