किनवट : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निम्मीत इस्लापुर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीस कुटूंबांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
सुरवातीला दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पून सर्व बांधवानी अभिवादन केले. त्यानंतर प्रा.कागणे, प्रा. बिभीषण पाळवदे, तुकाराम बोनगीर, डॉ. मुडे, प्रभाकर बोड्डेवार यांनी विचार मांडले .
याप्रसंगी ईस्लापुर येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किनगे, पोलीस उपनिरिक्षक कांदे, सरपंच देवीदास पळसपुरे, ऊपसरपंच श्रीरंग पवार,ग्रा. पं. सदस्य मनोज राठोड, गजानन कदम, पत्रकार ईश्वर जाधव, परमेश्वर पेशवे यांच्या हस्ते गावातील गरजु 20 कुटूंबाना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे शिवशंकर मुंडे, बाजीराव गुटे, दिलीप राख,वनरक्षक घुगे, वनवे, मारोती मुंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परीसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment