किनवट : दिव्यांगाचा तीन वर्षापासूनचा राखीव निधी खर्च न केल्यास जिल्हा परिषद नांदेड समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना सचिव राज माहुरकर यांनी दिला होता.
सदरील निवेदनात नमूद मागण्या : तीन वर्षापासूनचा राखीव निधी खर्च करण्यात यावा, दिव्यांगाची हेळसांड करणाऱ्या ग्रामसेवक यांच्या कामाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला घालणाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी. ह्या मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या होत्या.
अखेर अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना तालुका किनवटचे सचिव राज माहुरकर यांनी ग्रामपंचायत गोकुंदा येथील दिव्यांगांचा राखीव 5%टक्के निधी खर्च करण्याबाबत वारंवार केलेल्या आंदोलनाला यश आले. अखेर दिव्यांचा 5 टक्के राखीव निधी 3,95,878 रुपये एकूण 46 लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 8100 रुपये वर्ग करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment