नांदेड : रविवारी दिवसभराच्या काळात 59 अहवाल प्राप्त झाले, यामध्ये दोन अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर 57 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
पाच वाजता प्राप्त झालेल्या सर्वच्या सर्व 27 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभराच्या काळात एकही अहवाल पॉझिटीव्ह न आल्याने समाधान व्यक्त केले जात असताना रात्री दहा वाजता 32 अहवाल आले आहेत. यामध्ये दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आले, असून यामध्ये देगलूर नाका भागातील उमर कॉलनीमध्ये राहणार्या 54 वर्षीय इसमाचा समावेश आहे. तसेच गुलजार बागमधील 55 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 192 इतकी झाली आहे. अजून 27 स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.
No comments:
Post a Comment