किनवट (ऍड. विलास सूर्यवंशी ) : येथून जवळच असलेल्या घोटी येथील सरपंच यांचे वरील अविश्वास ठराव पारीत झाल्याने अखेर त्यांना पायउतार व्हावे लागले.
तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये बालाजी पावडे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले व त्यांनी सत्ता स्थापन केली होती. वच्छला संभा सातपुते यांची सरपंच पदी निवड झाली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे शकुंतला उल्हास राठोड ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. तदनंतर त्यांच्या विरोधात रितसर दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव आज 6 विरुद्ध 3 मताच्या फरकाने पारित झाला असल्याने ते सरपंच पदावरून पायउतार झाल्या आहेत.
मौजे घोटी ग्रामपंचायतीत एकूण 9 सदस्य असून दि.22-9-2019 रोजी शकुंतला उल्हास राठोड ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या.दरम्यान त्यांच्या कारभाराला वैतागून एकूण 9 सदस्या पैकी 6 सदस्यांनी दि.1-5-2020 रोजी सरपंच राठोड यांच्या विरोधात तहसीलदार किनवट यांच्याकडे रितसर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. प्रस्तावाच्या अनुषंगाने तहसीलदार उत्तम कागणे यांनी घोटी येथील ग्राम पंचायत कार्यालयात विशेष सभा बोलाविली होती. या विशेष सभेत ठरावाच्या बाजूने 6 तर सरपंच शकुंतला उल्हास राठोड यांच्या बाजूने केवळ 3 मते पडली . त्यामुळे अविश्वास ठराव पारित होऊन राठोड सरपंच पदावरून पायउतार झाल्या आहेत.
या सभेला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार उत्तम कागणे यांनी काम पाहिले. यावेळी मंडळ अधिकारी पी.व्ही. बूरकूले, तलाठी दाऊद खान, ग्राम विकास अधिकारी संदीप आंभोरे हे उपस्थित होते, तर पोलिस उपनिरीक्षक कांबळे व पोहेकॉ बोंडलेवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बालाजी पावडे यांच्या राजकीय अनुभवाचा व विकासात्मक दृष्टीकोनाचा गावाला फायदा होणार असल्यामुळे गावचा विकास पुनश्च वृद्धीगंत होईल अशा घोटीवासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जाहिरात
Translate
Live
Followers
Sunday, June 7, 2020

अविश्वास ठराव पारीत झाल्याने अखेर सरपंच झाले पायउतार
Tags
# किनवट तालुका
# नांदेड जिल्हा
Share This
About NIVEDAK NEWS
नांदेड जिल्हा
Tags
किनवट तालुका,
नांदेड जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड...
-
किनवट : सर्वसामान्यांच्या अंधाऱ्या आयुष्याला आपुलकीचा उजेड देणारा प्र'दीप' सूर्योदयापूर्वीच प्रभातसमी विझला. त्यांच्या पार्थिवावर ...
-
किनवट : मतमोजणी निरिक्षक कुलधीर सिंघ (एस.सी.एस.) यांचे उपस्थितीत 83- किनवट विधानसभा मतदार संघातून विधानसभा सदस्यपदी निवडून आल्याचे निवडणूक...
-
नांदेड ता. 7 मार्च : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान जिल्ह्यातील नायगाव तालुक्...
-
किनवट : येथील जवाहेरुल उलूम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील आदिना मरयम मोहम्मद अतीक या विद्यार्थिनीस केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांच...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951
No comments:
Post a Comment