किनवट : राज्यात व देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तीन महिण्याच्या लॉकडाउन नंतर आता अनलॉक सुरु करण्यात आला. म्हणजे हळहळु जीवन पुर्वपदावर आणण्याचे प्रयत्न चालु आहेत. परंतु कोरोना विषाणु व त्याचा संसर्ग झालेले रुग्ण यांचा आकडा दिवसागणिक वाढत जात आहे. ही चिंतेची बाब बनली आहे.
याच परिस्थितीत आगामी दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. या पार्श्वभुमीवर रोगराई देखील वाढते . हा आपला सर्वांचा पुर्वानुभव आहे तर संभाव्य निर्माण होणारी परिस्थिती पाहता कोरोना विषाणुचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो . त्या अनुषंगाने किनवट तालुक्यात किमान २०० बेडचे कोविड केअर सेंटर निर्माण केले गेले पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केली आहे.
कोरोना विषाणुच्या लढ्यात म्हणावे तेवढं यश अजुन प्राप्त झाले नाही. यामुळे नागरीकांनी शासनाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शक दिशानिर्देशाचे तंतोतंत पालन करावे. जेणे करुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होणार नाही. परंतु राज्याच्या मोठ्या शहरातील कोरोना ग्रस्ताचे आकडे पाहुन व शहरातील नागरीकांचे ग्रामीण भागात होणारे स्थलांतर पाहुन आता पावसाळ्यात निर्माण होणा-या परिस्थितीची चिंता वाटु लागली आहे. परिस्थिती कशाही प्रकारची असो, प्रशासनाने त्याकरीता उपाययोजना व पुर्व तयारी केली पाहिजे अन्यथा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या करीता जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन निर्माण होणा-या परिस्थिती कडे गांभिर्याने विचार करुन किनवट शहरात २०० बेड चे कोरोना विषाणु प्रादुर्भावाचे कोविड केअर सेंटर उभारले पाहिजे या करीता शहरात उपलब्ध शासनाच्या व नगर परिषदेच्या इमारतीचा विचार प्रशासनाने करावा त्यानंतर खाजगी रुग्णालय व शाळा तथा महाविद्यालयाच्या इमारतीचा देखिल पर्याय उपलब्ध आहे. या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या अनुषंगाने काम केल्यास पावसाळ्यात निर्माण होणा-या परिस्थितीशी मुकाबला करण्यास सर्व यंत्रणाना शक्य होणार आहे.
No comments:
Post a Comment