आज आढळले दोन पॉझिटिव्ह : एका स्त्री रूग्णाचा मृत्यू, १३२ बरे होऊन गेले घरी; तर ५२ रुग्ण घेताहेत उपचार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 8, 2020

आज आढळले दोन पॉझिटिव्ह : एका स्त्री रूग्णाचा मृत्यू, १३२ बरे होऊन गेले घरी; तर ५२ रुग्ण घेताहेत उपचार



नांदेड : आज सोमवार दिनांक ०८ मे रोजी सायंकाळी ०५.०० वाजता कोरोना विषाणू संदर्भात  प्राप्त झालेल्या एकूण ७६ अहवालापैकी ७२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन ०२ रुग्णांचा स्वॅव पॉझीटीव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १९२ एवढी आहे . 
             आज प्राप्त झालेल्या २ पॉझीटीव्ह पैकी १ रुग्ण पुरुष वय वर्ष ५४ रा . उमर कॉलोनी ता.जि.नांदेड व १ स्त्री रुग्ण वय वर्ष ५५ रा . गुलजार बाग देगलूर नाका परीसरातील आहे . वरील ०२ पॉझीटीव्ह पैकी , गुलजार वाग देगलूर नाका येथील स्त्री रुग्णास उच्च रक्तदाब , श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार असल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला आहे . आतापर्यंत १९२ रुग्णांपैकी १३१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ५२ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ६५ आणि २ पुरुष ज्यांचे वय ६५ व ७४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे . 
             
दि .०८ / ०६ / २०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता :  सर्वेक्षण १४३३९२, घेतलेले स्वॅब ४४८७, निगेटिव्ह स्वॅब ४०१४, आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब २, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण १९२, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १७६, स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या ८१,मृत्यू संख्या ९, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १३१, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ५२, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या १७.

         दिनांक ०८/०६/२०२० रोजी १७ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण १९२ पैकी ९ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १३१ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित ५२ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ११ रुग्ण , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण ३८. उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २ रुग्ण  तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर कोविड केअर सेंटर येथे १ रुग्ण उपचारासाठी दाखल असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते , असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 08/06/2020 वेळ 05.00 PM

आत्तापर्यंत एकूण संशयित - 4453
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4227
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2329
अजून निरीक्षणाखाली असलेले - 86
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 183
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4044
•   आज घेतलेले नमुने - 17
एकुण नमुने तपासणी- 4487
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 192
पैकी निगेटीव्ह - 4014
नमुने तपासणी अहवाल बाकी- 17
नाकारण्यात आलेले नमुने - 81
अनिर्णित अहवाल – 176
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 131
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 9
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 143392 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News