साक्षरता हवी मित्रा
नाही लिहण्यासाठी
नाही वाचण्यासाठी
तर माणूस म्हणून जगण्यासाठी
साक्षरता हवी मित्रा
स्वत्वाची भावना
जागृत करण्यासाठी
निरक्षरता अंधश्रद्धा
दूर करण्यासाठी
साक्षरता हवी मित्रा
अज्ञानतेचे सावट बाजूला
सारून प्रकाशाचे धडे घेण्यासाठी
साक्षरता हवी मित्रा
जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी
मूल्य शिक्षणाचे धडे गिरवून
सुजाण नागरिक होण्यासाठी
साक्षरता हवी मित्रा
मूलभूत कौशल्य शिकण्यासाठी
भावी पिढीवर संस्कार घडविण्यासाठी
अन्यायाला तडे देण्यासाठी
लबाडी फसवणूक यापासून वाचण्यासाठी
साक्षरता हवी मित्रा
महिलांचा विकास करण्यासाठी
सुखी जीवन जगण्यासाठी
समर्थ समाज भारत बनविण्यासाठी .
-भारती दिनेश तिडके
8007664039
No comments:
Post a Comment