किनवट, :कोरोनाची साथ संपेपर्यंत राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, शाळा बंदच ठेवा, सफाई कामगारांना सुविधा द्या,अशी मागणी "सेक्युलर मुव्हमेंट," या संघटनेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकतीच केली आहे.निवेदनावर अध्यक्ष प्रा.गौतमीपुत्र कांबळे,कार्याध्यक्ष भरत शेळके व सरचिटणीस प्रा.डाॅ.भरत नाईक यांच्या स्वाक्ष-या आहेत,अशी माहिती सेक्युलर मुव्हमेंट चे नांदेड जिल्हा संघटक ऍड.मिलिंद सर्पे व राज्य सचिव प्रा.डाॅ.अंबादास कांबळे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाचा विस्फोट होऊ नये यासाठी सर्व धार्मिक स्थळे आणखी काही दिवस बंद ठेवावीत.स्थिती नियंत्रणात असली तरी धोका टळलेला नाही.धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली असली तरी राज्यात ३० जूनपर्यंत ती बंदच राहणार आहेत.मात्र,त्यानंतर ती खुली केल्यास गर्दी होईल.प्रार्थनास्थळांतील गर्दी भावनिक असल्याने हटविणे किंवा नियंत्रणात आणणे कठीण होईल.त्यातून कोरोनाचा फैलाव होईल.त्यामुळे साथ संपुर्ण संपुष्टात येईपर्यंत प्रार्थनास्थळांना परवानगी देऊ नये.
कोरोनाकाळात सफाईचे महत्त्वाचे काम करणारे कर्मचारी दुर्लक्षित आहेत.डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसुविधा व सुरक्षा साधने सफाई कामगारांनाही मिळावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांकडे ' ऑनलाईन'साधने नाहीत
सरकार शाळा सुरु करण्याच्या नियोजनात आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांकडे साधने नाहीत.त्यामुळे हा निर्णय पुढे ढकलवा.विद्यार्थ्यांना साधने मिळाल्यावरच शाळा सुरु करा,असेही निवेदनात म्हटले आहे.




No comments:
Post a Comment