सुतगिरणीत कुजलय कोण ? सहायक जिल्हाधिकाऱ्यांचा फोन, वनाधिकाऱ्यांनी काय शोधले दोन ? - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 13, 2020

सुतगिरणीत कुजलय कोण ? सहायक जिल्हाधिकाऱ्यांचा फोन, वनाधिकाऱ्यांनी काय शोधले दोन ?


किनवट (परमेश्वर पेशवे ) : किनवट तालुक्यातील जलधरा येथील आदिवासी रेणुका सूतगिरणी मध्ये दोन बिबट्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याची दुर्गंधी सुटली आहे त्याची खातीरजमा करा, असा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा फोन येताच इस्लापुर वनविभागाची चांगलीच धावपळ उडाली.
              दोन महिन्यापूर्वी याच भागातील झळकवाडी शिवारात दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेचा विसरही पडला नाही तर जलधरा येथील आदिवासी रेणुका सूतगिरणी मध्ये दोन बिबटे मृत कुजलेल्या अवस्थेत असून त्याची दुर्गंधी सुटली आहे,  असा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा फोन आल्याने इस्लापूर येथील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता रात्री अंधार खूप असल्याने हे दोन मृतदेह बिबट्याचे आहेत की नाही याची खातरजमा करताना रात्रीला अडचण येत होती. त्यामुळे ईस्लापुर वन विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी येथे ट्रॅप कॅमेरा बसवून दिनांक 8 जुन रोजी  सकाळी साडे नवच्या दरम्यान येथे येऊन पाहणी करून मृत कुजलेल्या अवस्थेत असलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून त्यांची ओळख पटण्यासाठी खातीरजमा केली असता हे दोन्ही मृतदेह बिबट्यासारखे दिसणाऱ्या जंगली रानमांजरांचे असल्याची खात्री झाली. सदरील दोन्ही जंगली रानमाजरांचा पंचनामा केला असता  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.आश्वीन    यांनी त्या दोन जंगली रान मांजराचे 26 छेदन करून दोन्ही मृतदेह वनविभागाच्या ताब्यात दिले. यावेळी इस्लापूर वन विभागाच्या जिल्हा सहाय्यक वनसंरक्षक एस. मधुमिथा, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल चोबे, प्रकाश शिंदे, वनपाल ए. आर. देशमुख, वनरक्षक शिवकांता डुडूळे, वनमजूर रामदास मेंडके, चालक बी.टी. भोतकर, सेवक डी.एस. पांचाळ हे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News