नांदेड : आज शनिवारी (ता. 13 ) सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक फेसबुक लाईव्हवर नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तेव्हा सहभागी होण्यासाठी सायंकाळी 6.30 वाजता फक्त https://www.facebook.com/dionanded/ या लिंकवर क्लीक करावे.
लॉकडाऊनचे एक एक टप्पे जसेजसे शिथिल होत आहेत त्या प्रमाणात नागरिक सार्वजनिक जीवनाच्या व्यवहाराला पूर्ववत करू पाहत आहेत. सार्वजनिक जीवनमान सुरक्षित राहावे यासाठी शासनाच्या विविध विभागातर्फे गावपातळीवर सुविधा पोहोचव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
या प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक आज माहिती देऊन सुसंवाद साधतील.
नांदेड जिल्ह्यातील जीवनमान अधिक सुरक्षित, सौहार्दपूर्ण व्हावे यासाठी या लोकाभिमुख उपक्रमात आपला सहभाग अधिक सकारात्मक व्हावा या दृष्टीने आपल्या सूचना, काही प्रश्न असल्यास जरूर विचारावेत. आजच्या फेसबुक लाईव्हवर होणाऱ्या संवादात सहभाग घ्यावा, कमेंटबॉक्स मध्ये जरूर सूचना द्याव्यात.
आज 13 जून रोजी सायं. 6.30
@जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड या फेसबुक पेज लाईव्हवर.
https://www.facebook.com/dionanded/
आपल्या सूचना, प्रश्न असतील ते
मोकळेपणाने कमेंटबॉक्स मध्ये द्या.




No comments:
Post a Comment