नांदेड ( परवीनबेगम शेख ) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभाग नांदेड जिल्हा च्यावतीने भव्य रक्तदान शिबीर सिडको नवीन नांदेड येथे संपन्न झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर यांच्या वतीने सिडको नवीन नांदेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे व पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस तथा युवक मा.जिल्हाध्यक्ष वसंत पाटील सुगावे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवराव टिपरसे, मारोतराव पाटील डक, सिंधुताई देशमुख, युवक प्रदेश सचिव बाळासाहेब भोसीकर, सदस्य स्वप्निल पाटील इंगळे, लोकहित लाईव्ह न्यूजचे संपादक साहेबराव कोलंबीकर, विलास गजभारे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार ग्रंथालय विभागाचे प्रांताध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनासारख्या महामारीच्या संकटाच्या वेळी हा वर्धापनदिन रक्तदान करून सिडको नवीन नांदेड येथे साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी नांदेड ब्लड बॅंकेचे कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय विभागाचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष अंकुश पाटील शिखरे, नांदेड तालुकाध्यक्ष विष्णु उदावंत, गजानन पवळे, बालाजी होळकर, शिवानंद मठपती, प्रा.महेश स्वामी, राजेशभाऊ लहानकर, उत्कर्ष भोसीकर, भुषण टिपरसे, विक्की गायकवाड, उत्तम शिंदे, ऍड.आनंद सूर्यवंशी, शिवचरण ठाकूर, उन्हाळे, प्रमोद पंडित, किरण नांदेडकर यांनी सहकार्य केले.




No comments:
Post a Comment