नांदेडला दिलासा : नऊ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी, आज एकही पॉझिटिव्ह नाही - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 14, 2020

नांदेडला दिलासा : नऊ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी, आज एकही पॉझिटिव्ह नाही


नांदेड : आज रविवार ( दिनांक १४ जून २०२० ) रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त माहितीनुसार पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील ६ रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील २ रुग्ण तसेच कोविड केअर सेंटर माहूर येथील १ असे ९ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या १७७ एवढी झाली आहे.
            आज रविवारी (दिनांक १४ जून २०२० रोजी ) प्राप्त झालेल्या एकूण ९८ अहवालापैकी ९४ अहवाल  निगेटिव्ह  प्राप्त झाले, ०४ अहवालांचा निष्कर्ष अनिर्णीत आहे व नवीन एकही रुग्णाचा स्वॅव पॉझीटीव्ह न आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २५६ एवढी आहे. आतापर्यंत २५६ रुग्णांपैकी १७७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ६६ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ५२ आणि ०२ पुरुष ज्यांचे वय ५२ व ५४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .
           
दि.१४ जून २०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४८०५१, घेतलेले स्वब ५०१९, निगेटिव्ह स्वॅब ४३४७, आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या ०, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण २५६, स्वॅब तपासणी अनिणीत संख्या १९१, स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या ८३, मृत्यू संख्या १३, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १७७, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण६६, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या १३५.

दिनांक १४/०६/२०२० रोजी १३५ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण २५६ रुग्णांपैकी १३ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १७७ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरित रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १७ रुग्ण , पंजाव भवन कोविड केअर सेंटर येथे एकूण ४२ तसेच उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २ उपचारासाठी दाखल असून ५ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 14/06/2020 वेळ 05.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4980
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4562
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2686
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 228
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 110
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4452
•   आज घेतलेले नमुने - 70
• एकुण नमुने तपासणी- 5019
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 256
• पैकी निगेटीव्ह - 4347
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 135
• नाकारण्यात आलेले नमुने - 83
• अनिर्णित अहवाल – 191
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 177
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 148051 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News