कर्मयोगी गीताचार्य तुकारामदादा यांना शब्दांजली -यशोधरा सोनेवाने, गोंदिया - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 15, 2020

कर्मयोगी गीताचार्य तुकारामदादा यांना शब्दांजली -यशोधरा सोनेवाने, गोंदिया





कर्मयोगी गीताचार्य तुकारामदादा यांना शब्दांजली
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
   
दि. १६ जून  तुकारामदादा गीताचार्य यांची पुण्यतिथी  निमीत्ताने प्रासंगिक लेख. -संपादक



तत्कालीन विस्कटीत झालेली समाजरचना विषमतेमुळे रक्तक्रांतीकडे चालली होती.अशा समाजरचनेलाच संक्रीय अध्यात्माद्वारे बदलून शांतता ,स्थिरता  व समत्वाकडे नेणारे *युगपुरूष राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे*  तत्त्वज्ञान साकार करणारे ,सर्वस्वी समर्पक  शेवटच्या श्वासापर्यत क्षणाचीही उसंत न ठेवणारे *त्यागी ,तपस्वी  अनूभवी  कर्मयोगी ब्रम्हलीन परम् पुज्य श्री तुकारामदादा गीताचार्य* यांच्या पावन स्मृतीत शब्द पुष्प अर्पित करीत आहे. यांचे कार्य आजच्या काळातही जनकल्यान  सतत घडवित आहेत. *सार्थ ग्रामगीता* आजही जनसामान्यासाठी *संजीवणी* ठरत आहे.अनेक वर्षापासून ही सार्थग्रामगीता   अनेक वाचकांनी प्रेरक ,मार्गदर्शक आहे. 
     तुकारामदादा गीताचार्य यांचेकडून अध्यात्म ज्ञानाचा अनुभव जाणून घेण्याची प्रेरणा आजही सार्थ ग्रामगीता  ही देत आहे.  तुकारामदादांना एकदा शेगावला जाण्याचा योग आला . त्यावेळी गजानन महाराज संस्थानच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या गेस्ट हाऊसमध्ये दादासोबत चर्चा घडली. एकांतात दीड तास अध्यात्म ज्ञानाचे बाबतीत आपल्या अनुभवाचे अनेक प्रश्न विचारून दादांकडून सर्व प्रश्नांचे शंकासमाधान अनेकांनी  करून घेतले. आणि त्याबद्दल "पूर्ण समाधान झाल्याचे" अनेकानी व्यक्त केले .त्यामुळे दादावर व दादांच्या कार्यावर  लोकांचा कायम आत्मविश्वास बसला .आणि आनंदाच्या भरात  ते बोलले की २० वर्षापूर्वी आमचा दादांशी संबंध आला असता तर आम्ही  तेव्हापासूनच दादांचे सहवासात राहिलो असतो . दादांचा संबंध फार उशिरा आला त्याबद्दल अनेकानी त्याप्रसंगी खंत ही व्यक्त केली . नंतर अध्यात्म गुरुकुल गुरूकुंज मोझरीला राष्ट्रसंतांच्या स्मृतिदिनी व गीताजयंतीला दादांच्या जन्मदिनी अडयाळ टेकडीवर वर  "ग्रामगीता" विविध आध्यात्मिक कार्यक्रम सातत्याने होत असतात.दादांचे मोझरी , अडयाळ टेकडी , टेकडी जवळील चोरटी , लाखापूर येथील व पंढरपूर येथील विविध प्रकारचे कार्यक्रम करून समाज जागृती करण्यात आली. “ दादांचे कार्य आमच्या कार्यापेक्षा कितीतरी महान आहे , एवढं महान कार्य आम्ही करू शकत नाही पण दादांच्या कार्याला आमचे परीने आम्ही सतत | सहकार्य करीत राहणार " असा त्याप्रसंगी संकल्प घेतला . त्यानुसार लाखापूर व चोरटी या दोन गावी भव्य असे ग्रामसभा भवन बांधून दिले . पंढरपूरच्या कामालाही सतत सहयोग देत राहिले.
            ही सार्थ ग्रामगीता जास्तीत जास्त आकर्षक बनविण्यासाठी  त्यातील सर्व फोटो रंगीत आर्ट पेपरवर घेण्यातआले. यातही तुकाराम दादाच मार्गदर्शक होते.  दादांच्या मार्गदर्शनाखाली लहान - मोठ्या मराठी , हिंदी , इंग्रजी , संस्कृत , तेलगु भाषेत आत्मानुसंधान प्रकाशन मंडळाने २॥ लाख ग्रामगीता प्रकाशित    करण्यात आले. असे संत तुकडोजी महाराजांचे महान कार्य अजूनही माझे हातून मोठया प्रमाणात होत असेल तर, दादांनी वयाच्या ९० व्या वर्षी " मी वयाचे शंभर वर्ष पूर्ण करून गीताजयंतीला माझे जन्मदिनी त्याचवेळी संजीवन समाधी घेईल " असा दादांनी स्वतःच संकल्प जाहीर केला होता . " पण मला योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही तर मी अगोदर केव्हाही समाधी घेईल " असेही त्यांनी सांगून ठेवले होते . पण दादांनी नकळत सर्वांना अंधारात ठेवून वयाच्या ९२ व्या वर्षीच दि . ८ जून २००६ ला पुण्याला सासवड जवळील पारगाव येथील निसर्गोपचार केन्द्रात प्रकृतीचा स्वास्थ्याकरिता विश्रांती घेत असतांना बोलून चालून प्रकृती स्वस्थ असतांना कोणाला कोणतीही चाहूल लागू न देता रात्री ८ वाजता फलाहार घेतला , भाजीचे सूप घेतले आणि जवळच्या सेवकाला सांगितले आता तू झोप आणि मीही झोपतो असे सांगून नकळत संजीवनी समाधीत गेले आणि परत आलेच नाही . त्यांच्या नेहमीच्या प्रक्रियेनुसार ते समाधीतून बाहेर येतील अशी अपेक्षा करीत तेथील मंडळी रात्री १२ वाजेपर्यंत वाट पाहात राहिली शेवटी परत येत नाही अशी तेथील सर्वांची खात्री झाल्यावर तुकारामदादांना दि.९ जूनला सकाळी तेथून त्यांच्या तपोभूमिकडे अड्याळ टेकडीवर आणण्याकरिता हलविण्यात आले व दि. १० जूनला दुपारी ४ वाजता त्यांचे पूर्व - सूचनेनुसार  चाळीस हजार जनसमुदायाच्या साक्षीने अखंड संजीवन समाधीत श्रीगजानन महाराजांच्या पूजाविधीप्रमाणे  पूजा करून बसवून दिले . दादांनी आपल्या समाधीवर येणाऱ्या दर्शनार्थीना कशी व कोणती पूजा करावी हे सुद्धा सांगून ठेवले होते की , “ माझे या समाधीवर कोणीही कुंकू , गंध , बुक्का , गुलाल , अक्षदा , पुष्प , कापूर , धुपबत्ती या कोणत्याही साधनांनी पूजा करू नये . नारळ , चिरंजीदाणे आदि कोणताही प्रसाद वाटू नये तर ग्रामगीतेतील आपल्या आवडीनुसार कोणताही संकल्प ठरवून " संकल्पाचे पुष्प सुगंधी , वाहूनी तुकड्या अविरत वंदी " याप्रमाणे संकल्प पुष्पांजली अर्पण करून समाधीतून कृपाप्रसाद घ्यावा . त्याप्रमाणेच समाधीजवळ व्यवस्था करण्यात आली.तुकाराम दादावर आणि दादांच्या कार्यावर श्रद्धा असणाऱ्या सर्वांनी आपआपल्या परीने दादांचे उर्वरित समाजसेवेचे कार्य हातात घेऊन त्या कार्याची संकल्पपुष्पांजली वाहून दादांना श्रद्धांजली अर्पण करीत राहावे . दादांनी आपले पंचमहाभूताचे शरीर पंचमहाभूताचे स्वाधीन करून ते आता ज्ञान स्वरूपात व कार्यस्वरूपात अमर आहेत . आपण त्यांचे ज्ञानग्राहक व कार्यवाहक बनावे . दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण त्याग , तपश्चर्या , निष्काम सेवा करून आत्मानुभव मिळविला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्यात व ग्रामगीतेचे तत्त्वज्ञान जनमानसात साकार करण्यात अहोरात्र काळ घालविला . हा ग्रामगीता ग्रंथ , सर्व संत , धर्मग्रंथांचा सार असून सर्व जग सुखी व्हावे म्हणून आतापर्यंत जे संत - महात्मे , ऋषी - मुनी झटत आले असतांना , त्यांना जो सापडला नाही तो ग्रामकुटुंब योजनेचा मार्ग या ग्रामगीतेत संत तुकडोजी महाराजांना सापडला . अशा विशाल व महान तत्वज्ञानाचा हा सक्रिय ग्रामगीता ग्रंथ आहे . आजच्या कलियुगाचे परिवर्तन करून त्याला सत्ययुगात रुपांतर करणारा हा ग्रामगीता ग्रंथ आहे . निव्वळ विज्ञानाचे आधारावर समाजात विषमता पैदा करून समाजात कहर माजविणाऱ्या समाज रचनेला बदलवून ती विज्ञान आणि अध्यात्माचा संयोग आणि समानतेच्या सहयोगातून सर्व सृष्टी स्वर्गाप्रमाणे बनविणारी संत बोधावर आधारित समाज रचना घडविणारा हा ग्रामगीता ग्रंथ आहे . त्यादृष्टीने हा संजीवनी बुटी समान असणारी ग्रामगीता ग्रंथ सतत प्रत्येकाजवळ असावा व मोठया साईजचा ग्रामगीता ग्रंथ हा प्रत्येक घरी ठेवावा आणि तो सर्वांनी वाचून समजून घेऊन प्रत्यक्ष आचरणात आणला म्हणजे तेव्हाच  " हो सर्व लोक सुखी सदा , सर्वास हो आरोग्यता ! कल्याण पथ सकळा कळो , लाभो न कोणाही व्यथा , श्रृती संत हे उद्गारले , द्या साह्य त्यांच्या स्फूर्तीना , व्हाया वाचन त्याचे पूरे , करु सामुदायिक प्रार्थना ' हा  श्रृतीमंत्र साकार होईल. तुकारामदादाच्या स्मृतीत विनम्रअभिवादन.


-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
  (9420516306 )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News