24 व्यक्ती कोरोना बाधित : 14 पुरुष व 10 महिलांचा समावेश ; बरे झाल्याने तिघांना रुग्णालयातून सुट्टी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 16, 2020

24 व्यक्ती कोरोना बाधित : 14 पुरुष व 10 महिलांचा समावेश ; बरे झाल्याने तिघांना रुग्णालयातून सुट्टी



नांदेड : जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 24 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील संख्या 286 वर पोहचली आहे. नवीन बाधितांमध्ये 14 पुरुष तर 10 महिलांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 3 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
             या 24 बाधितांपैकी नांदेड सोमेश कॉलनी येथील 3 पुरुष वय अनुक्रमे 22, 41, 53 व 23 वर्षाची एक महिला. शिव विजय कॉलनी येथील 67 वर्षाचा एक पुरुष व तीन महिला वय वर्षे अनुक्रमे 3, 37 व 61 आहे. श्रीकृष्णनगर येथील 61 वर्षाचा एक पुरुष व 29 वर्षाची एक महिला. फरांदेनगर येथील 55 वर्षाचा एक पुरुष. एमजीएम परिसरातील 30 वर्षाचा एक पुरुष. विशालनगर येथील 49 वर्षाचा एक पुरुष. बरकतपुरा येथील 36 वर्षाचा एक पुरुष. परिमलनगर येथील 55 वर्षाचा एक पुरुष. चिखलवाडी येथील 52 वर्षाची एक महिला. दिपनगर येथील 19 वर्षाची एक महिला तर मुखेड येथील 3 पुरुष वय वर्षे अनुक्रमे 11, 30, 55 व तीन महिला वय वर्षे अनुक्रमे 38, 50, 65 असे आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील 38 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. 
             मंगळवारी प्राप्त झालेल्या 278 अहवालांपैकी 230 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. 
आतापर्यंत 286 बाधितांपैकी 180 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 93 बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 93 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. मंगळवार 16 जून रोजी 167 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 464,
घेतलेले स्वॅब 5 हजार 397,
निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 630,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 24,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 286,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 220,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-86,
मृत्यू संख्या- 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 180,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 93,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 167 एवढी संख्या आहे.
             कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ऍप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केलेआहे                                                  
             
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 16/06/2020 वेळ 05.00 PM

आत्तापर्यंत एकूण संशयित - 5324
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4843
क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2732
अजून निरीक्षणाखाली असलेले - 288
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 142
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4701
•   आज घेतलेले नमुने - 99
एकुण नमुने तपासणी- 5397
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 286
पैकी निगेटीव्ह - 4630
नमुने तपासणी अहवाल बाकी- 167
नाकारण्यात आलेले नमुने - 86
अनिर्णित अहवाल – 220
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 180
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145464 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
         
                      

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News