स्वराज्याच्या संस्थापक,आदर्श माता : राजमाता जिजाऊ
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
राजमाता जिजाऊ भोसले पुण्यतिथी निमीत्त त्यांना विनम्र अभिवादन करणारा यशोधरा सोनेवाने, गोंदिया यांचा प्रासंगिक लेख- संपादक
स्वराज्याच्या संस्थापक,आदर्श माता : राजमाता जिजाऊ हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स .१५ ९ ८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला . राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या . आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते .
जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये झाला.आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई - नागपूर हायवेला लागुनच आहे . याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे . येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे . ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे . ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल . याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती . येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे , या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे , तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे . या मंदिरासमोरच चौकोनी आकारात , तळापर्यंत उतरण्यासाठी पायांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे . तर ८ व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे .
राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ . अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत . यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो , त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता , आतमध्ये विहीर , भुयारी तळघरे , भुयारी मार्ग आहेत . तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे . मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा नमूना या तलावाच्या अतिसुंदर नमूणा आहे . मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना . या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून , विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे . मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे . तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे . या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे . ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती . तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे , त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या , या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे .
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले . त्याची संपुर्ण जवाबदारी जिजामातेन स्वतः उचलली . त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं . शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जवाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या . शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती .परंतु मावळ्यांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली . पुण्याचा विकास , राज्यकारभार हाताळणे , शेतक-यांना मदत करणे , तंटे सोडवणे , यांसारख्या जवाबदा-या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत . शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे , राम कृष्णाच्या , बलाढय आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या . शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनितीचे बाळकडू देखील पाजले . न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणा-याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने शिवाजी महाराजांवर बिंबवले .यावेळी चुळीया खनके ,सोनाचांदी चमके यासारखी परिस्थिती होती.
लहान वयात जिजामाता यांचे लग्न झाले . वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता . त्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी पडली होती . जिजाऊ *आदर्श माता मराठा साम्राज्याच्या संस्थापक* म्हणूनही त्यांचे नाव आग्रहाने घेतले जाते . त्यामुळे त्या महाराष्ट्रात आदर्श माता म्हणून प्रचलित आहेत . टपाल तिकीटाचे अनावरण जिजामाता यांचे मराठा साम्राज्यातील कार्याची दखल घेत सरकारकडून 1999 मध्ये त्यांच्या नावाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले . तीन रुपयांमध्ये हे टपाल तिकीट उपलब्ध करण्यात आले होते .
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामातेन 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला जणु छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती . महाराष्ट्र जशी विरपुत्रांची भुमी आहे तशीच विर मातांची देखील आहे. हे राजमाता जिजाउं माँ साहेबांना पाहुन लक्षात येते,आणि आपला महाराष्ट्राची वीर व आदर्श माता सा-याजगाला भारावून सोडते.अशा मातेला शत् शत् नमन
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
(9420516306 )





No comments:
Post a Comment