धन्य जिजाऊ ( कविता )
-महेन्द्र सोनेवाने ( यशोमन),गोंदिया
जिजाऊ तुमच्या मुळेच ,
शिवराय आणि शंभू मिळाले ।
स्वराज्य मिळविण्यासाठी ,
शिवबासोबत मावळे ही लढले ।|
मुजरा त्या जिजाऊला ,
जीने घडविले शूर शिवबाला ।
सर्वांना सांभाळले प्रेमाणे ,
कधी कमी न करते आशिर्वादाला ॥
जिजाऊच्या छायेत नव्हता जातीधर्म ,
सर्व धर्म समभाव होते एकच कर्म ।
मराठी मातीत ज्याने केला गनिमिकावा ,
तो एकच मराठा जिजाऊचा शिवा ॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला ,
राहूदे शिवयाची स्मृति सोबतीला ।
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा ,
तुझ्या स्मरणाने सुखी काळ जावा ॥
गायली सर्वानी तुझ्या शौर्याची गाथा ,
म्हणूनच सर्वाचा झुकतो आहे माथा ।
अशीही जिजाऊ साक्षात वात्सल्य नामी ,
धन्य तो शिवाजी अन धन्य धन्य तूम्ही ॥
-महेन्द्र सोनेवाने ( यशोमन),गोंदिया
9421802067




No comments:
Post a Comment