जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल बाबुराव केंद्रे व गोविंद अंकुरवाड यांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 19, 2020

जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल बाबुराव केंद्रे व गोविंद अंकुरवाड यांचा सत्कार


किनवट : भारतीय जनता पार्टीच्या ओ.बी.सी.आघाडी (ग्रामिण) च्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बाबुराव केंद्रे तर भाजपा आदिवासी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी गोविंद अंकुरवाड यांची भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामिण) व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी  नियुक्ती केली. आमदार केरामांच्या हस्ते  (१८ जून) नियुक्तीपत्र सुपूर्द केले. 
          नांदेड जिल्हा भाजपाच्या  जिल्हाध्यक्षपदी (ग्रामिण) व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांच्या नियुक्तीनंतर सर्व आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे अपेक्षीत होते. परंतु मध्येच कोरोनाची टाळेबंदी लागली म्हणून विलंब झाल्याचे सांगण्यात आले. १६ जून २०२० रोजीच आमदार भीमराव केरामांकडे  गोजेगांवकरांनी नियुक्तीपत्र पाठवले होते. आमदार केरामांनी आज (१८ जून २०२०) त्यांच्या निवासस्थानी बाबुराव केंद्रे व गोविंद अंकुरवाड यांना नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या. दोघांकडे यापुर्वी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांच्यावर तालुकक्याऐवजी जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यासाठी  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपा जिल्हा संघटक गंगाधरराव जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

        नियुक्तीनंतर लोकादेश कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष भगवान हुरदुखे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, विहिंपचे अनिरुद्र केंद्रे, डाॅ. नामदेव कराड, पत्रकार बी.एल.कागणे,  शकील बडगुजर, चतुरंग कांबळे, आशिष देशपांडे, साजीद बडगुजर, संतोष सिसले, पुंडलीक गायकवाड बोधडीकर, शिवाजी गीते बोधडीकर,  सागर पिसारीवार, मारोती तोटरे इत्यादींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News